एक्स्प्लोर

अंडर-19 : ऑस्ट्रेलियाला धूळ चारत टीम इंडिया चौथ्यांदा विश्वविजेता बनणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आजवर प्रत्येकी तीनवेळा हा विश्वचषक जिंकला आहे. अंडर-19 विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याची उभय संघांना संधी आहे.

मुंबई : अंडर-19 विश्वचषक कोण जिंकणार, पृथ्वी शॉचा भारतीय संघ की, जेसन सांघाचा ऑस्ट्रेलिया संघ? न्यूझीलंडमध्ये आयोजित अंडर – 19 विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या खेळवण्यात येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आजवर प्रत्येकी तीनवेळा हा विश्वचषक जिंकला आहे. अंडर-19 विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याची उभय संघांना संधी आहे. सेमीफायनलमध्ये भारताचा डावखुरा स्पिनर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या अर्शद इक्बालला माघारी धाडलं आणि पृथ्वी शॉच्या भारतीय संघाचं अंडर -19 विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म झालं. भारताने पाकिस्तानविरुद्धचा हा सेमीफायनल तब्बल 203 धावांनी जिंकला. अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आता भारताचा मुकाबला जेसन सांघाच्या ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून या विश्वचषकाची फायनल गाठली आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने 2000, 2008 आणि 2012 साली, तर ऑस्ट्रेलियाने 1998, 2002 आणि 2010 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. पृथ्वी शॉचा भारतीय संघ आणि जेसन सांघाचा ऑस्ट्रेलिया संघ यंदा चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला अंडर-19 विश्वचषकाचा हा अंतिम सामना शनिवारी माऊंट मॉन्गानुईच्या रणांगणात खेळवण्यात येईल. योगायोगाची गोष्ट म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला साखळी सामनाही माऊंट मॉन्गानुईच्याच मैदानात खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचं मनोबल हे ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत उंचावलेलं असेल. अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाची मदार प्रामुख्याने चार फलंदाजांवरच राहिल. कर्णधार पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुबमन गिल आणि हार्विक देसाई या चौघांनीच या विश्वचषकात सातत्याने धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये नाबाद शतक झळकावणारा शुबमन गिल हा या विश्वचषकातला सर्वात यशस्वी फलंदाज आहे. शुबमनने पाच सामन्यांमधल्या चार डावांत तब्बल 341 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तीन अर्धशतकं आणि एक नाबाद शतकाचा समावेश आहे. शुबमनची सरासरी आहे 170.50. कर्णधार पृथ्वी शॉने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 77.33 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीच्या मनज्योत कालराने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. यष्टिरक्षक हार्विक देसाईने तीन सामन्यांमधल्या तीन डावांत 55 च्या सरासरीने 110 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. अंडर-19 विश्वचषकात भारताचं आक्रमणही भलतंच धारदार ठरलं आहे. दुखापतीतून सावरलेल्या ईशान पोरेलने पाकिस्तानच्या चार प्रमुख फलंदाजांना माघारी धाडून भारताला उपांत्य सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला. पण ईशान पोरेलआधी अनुकूल रॉय, शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि अभिषेक शर्मा या चौघांनीही या विश्वचषकावर आपला ठसा उमटवला आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या अनुकूल रॉयने पाच सामन्यांमध्ये अवघ्या 95 धावा मोजून बारा फलंदाजांना माघारी धाडलं आहे. 14 धावांत 5 विकेट्स ही त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली. वेगवान गोलंदाज शिवम मावीने पाच सामन्यांमध्ये 124 धावा मोजून 8 विकेट्स घेतल्या आहेत. 45 धावांत तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कमलेश नागरकोटीच्या वेगानेही या विश्वचषकात धुमाकूळ घातला आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 106 धावा मोजून 7 फलंदाजांचा काटा काढला आहे. त्याची 18 धावात 3 विकेट्स ही विश्वचषकातली सर्वोत्तम कामगिरी आहे. डावखुरा स्पिनर अभिषेक शर्माने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 66 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे. अकरा धावांत दोन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याच्या शिलेदारांनी अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलआधी बजावलेली वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कितीतरी पटीने सरस असली, तरी ती सारी कामगिरी हा आता इतिहास झाला आहे. त्यामुळे त्या कामगिरीने हुरळून न जाता भारतीय संघ फायनलच्या रणांगणात उतरला, तर विश्वचषक जिंकणं कठीण ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Embed widget