एक्स्प्लोर

Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!

Pune Elevated Highway Project : पुण्याची वाहतूक कोंडी फोडणाऱ्या पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन मोठ्या उन्नत महामार्ग प्रकल्पांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले.

Pune Elevated Highway Project : पुण्याचा वेगाने होणारा विस्तार आणि त्यामुळे नागरिकांना भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन अत्यंत महत्त्वाकांक्षी उन्नत महामार्ग (Elevated Highway) प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी, हे तीन प्रकल्प पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे असून खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प प्रत्यक्ष मैदानात उतरू शकले आहेत, असेही त्यांनी आपल्या मनोगतात आवर्जून नमूद केले. हे तिन्ही मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे.

औद्योगिक पट्टा आणि आयटी हबला मिळणार वेग

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पुणे हे आता केवळ विद्येचे माहेरघर राहिले नसून ते उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराचे एक जागतिक केंद्र बनले आहे. हडपसर-यवत मार्गामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होऊन नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होईल. तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गामुळे पुण्यातील मोठ्या औद्योगिक पट्ट्याला (Industrial Belt) आधुनिक रस्ते संपर्क मिळेल, ज्यामुळे मालवाहतुकीला गती मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच पुणे मेट्रो, रिंग रोड आणि विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा विस्तार यासाठी आवश्यक निधी प्रभावीपणे दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक फाटा ते राजगुरूनगर महामार्गाबाबत महत्त्वाच्या सूचना

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि थेट उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्गाचे महत्त्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या प्रकल्पाच्या भूसंपादनात येत असलेल्या तांत्रिक अडचणी प्रशासनाने तातडीने दूर कराव्यात आणि हा प्रकल्पही लवकरात लवकर मार्गी लावावा, अशा कडक सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तिन्ही रस्ते प्रकल्पांची वैशिष्ट्ये आणि स्वरूप:

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आले असून, त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:

प्रकल्प मार्ग एकूण लांबी वैशिष्ट्ये आणि फायदे
पुणे – शिरूर महामार्ग ५४ किमी ३१ किमी सहा पदरी उन्नत मार्ग, ४ पदरी समांतर रस्ता. सुरुवातीच्या ७ किमी भागात भविष्यातील मेट्रोची तरतूद. प्रवासाचा वेळ २ तासांवरून ४५ मिनिटांवर येणार.
हडपसर – यवत महामार्ग ३१.५ किमी २५ किमी उन्नत बहुस्तरीय मार्ग. उरुळी कांचनपर्यंत मेट्रोसाठी तरतूद. पुरंदर विमानतळ, NH-65 आणि पुणे रिंगरोडशी थेट जोडणी.
तळेगाव – चाकण – शिक्रापूर ५३ किमी २६ किमी उन्नत बहुस्तरीय महामार्ग. स्थानिक आणि जलद वाहतूक वेगळी होणार. चाकण औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार.

या तिन्ही प्रकल्पांमुळे आगामी काळात पुण्याची वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे बदलणार असून, पुणे आणि परिसरातील दळणवळण अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget