एक्स्प्लोर

चेन्नई सुपरकिंग्जच्या पुण्यातील सामन्यांचं वेळापत्रक

महाराष्ट्रातील सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे चेन्नईचे सामने पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हलवण्यात आले आहेत.

मुंबई : दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुरक्षेच्या कारणास्तव होमग्राऊंडवरील सामने अचानकपणे रद्द करावे लागले. मात्र महाराष्ट्रातील सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे चेन्नईचे सामने पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हलवण्यात आले आहेत. तामिळनाडूत कावेरी आंदोलन पेटल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला. होम ग्राऊंडवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनसनाटी विजय मिळवत चेन्नईने घरच्या मैदानात पुनरागमन साजरं केलं. मात्र या सामन्यादरम्यान मैदानाबाहेर आंदोलकांनी गोंधळ घातला होता. कावेरी पाणीवाटप लवादाची नियुक्ती करण्यासाठी तामिळनाडूतील राजकीय संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आयपीएलला सुरक्षा पुरवली जाऊ शकत नाही, असं चेन्नई पोलिसांनी बीसीसीआयला कळवलं. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सर्व सामने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे हे सीएसकेला होम ग्राऊंड म्हणून देण्यात आलं. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला होता. मैदानाच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली. सीएसकेचे होम ग्राऊंडवर एकूण सात सामने होणार होते, मात्र आता सुरक्षेच्या कारणामुळे हे सामने पुण्यात खेळवण्यात येतील. दरम्यान, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं हे यापूर्वीही होम ग्राऊंड होतं. पुणे सुपरजाएंट्सचा कर्णधार म्हणून तो या मैदानावर खेळलेला आहे. चेन्नईचे पुण्यातील सामने 20 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स 28 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स 30 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स 5 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 13 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद 20 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब दरम्यान, पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर या आयपीएलमधले एकूण आठ सामने होतील. सीएसकेचे सहा आणि यापूर्वीच ठरलेला पहिला एलिमिनेटर आणि पहिला क्वालिफायर पुण्यात खेळवण्यात येईल, जो 23 आणि 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget