एक्स्प्लोर

लॉर्डसवर बेभान होऊन फिरवलेला टी-शर्ट अन् गांगुलीची 14 वर्षापूर्वीची आठवण!

मुंबई: क्रिकेटमधील एखादी खेळी देखील एखाद्या खेळाडूचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. अशा काही खेळी आणि असे खेळाडू नेहमीच क्रिेकेट चाहत्यांच्या लक्षात राहतातं. अशीच चौदा वर्षापूर्वीच एक खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहते आजवर विसरु शकले नाहीत.   या विजयानंतर टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरभ गांगुली देखील आपला आनंद लपवू शकला नव्हता आणि थेट लॉर्डसच्या गॅलरीमध्येच त्यानं आपलं टी-शर्ट काढून गरागरा फिरवलं होतं.   आजच्याच दिवशी म्हणजेच 14 वर्षापूर्वी 13 जुलै 2002 रोजी टीम इंडियानं इंग्लंडला त्यांच्याच धरतीवर धूळ चारली होती. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद कैफनं केलेली खेळी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिली.   संपूर्ण नेटवेस्ट मालिकेत इंग्लडं आणि टीम इंडियामध्ये अटीतटीचे सामने झाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचं लक्ष लागून राहिलं होतं.   6..1   क्रिेकेटची पंढरी ओळखलं जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर हा अंतिम सामना होता. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्णधार नासीर हुसैन याने 115 धावांची खणखणीत खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंडनं तब्बल 325 धावांपर्यंत मजल मारली होती.   हा सामना जिंकून इंग्लंडला इंग्लंडच्याच धरतीवर लोळवण्याची नामी संधी टीम इंडियाकडे होती. मात्र, त्यासाठी तब्बल 325 धावांचा यशस्वी पाठलाग करणं महत्वाचं होतं. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या सौरभ गांगुलीनंही विजय मिळवायचाच या जिद्दीनं खेळण्यास सुरुवात केली. सेहवाग आणि गांगुलीनं 106 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला. मात्र, गांगुली बाद झाल्यानंतर टीम इंडिया अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागली. 106 धावांवर 1 बाद अशी अवस्था असताना 146 धावांवर 5 बाद अशी केविलवाणी अवस्था टीम इंडियाची झाली. गांगुली, सेहवाग, मोंगिया, द्रविड आणि तेंडुलकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाज तंबूत परतले होते.   लॉर्डसवर बेभान होऊन फिरवलेला टी-शर्ट अन् गांगुलीची 14 वर्षापूर्वीची आठवण!   याच वेळी टीम इंडियासाठी दोन तरुण आणि धडाकेबाज खेळाडू धावून आले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह. सुरुवातीला संयमी खेळी करत या दोघांनी डावाला पुन्हा आकार दिला. त्यानंतर त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. आता टीम इंडिया विजयाच्या समीप पोहचणार असं वाटत असतानाच युवराज कॉलिंगवूडच्या एका चेंडूवर फसला आणि 69 धावांवर बाद झाला. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास टीम इंडिया गमावणार का असं वाटू लागलं. पण त्याचवेळी मोहम्मद कैफनं तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेली. या सामन्यात बरेच चढ-उतार आले होते.   आधीच्या मालिकेत ज्या फ्लिंटॉपनं भारतात विजय मिळविल्यावर भर मैदानात टी-शर्ट काढला होता. त्याच्याच ओव्हरमध्ये कैफनं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला होता. ते देखील तीन चेंडू राखून. हा विजय मिळवताच कर्णधार गांगुली मात्र, आपल्या भावना रोखू शकला नव्हता आणि त्यानं लॉर्डसच्या गॅलरीतच थेट आपला टी-शर्ट काढून गरागरा फिरवला होता. हा सामना चाहत्यांना ज्याप्रमाणे कैफच्या खेळीसाठी लक्षात राहिला त्याचप्रमाणे तो गांगुलीच्या बिनधास्त अॅटिट्यूडसाठीही लक्षात राहिला.  

महत्त्वाच्या बातम्या

BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
Embed widget