HPCA stadium in Dharamsala : धर्मशाला मैदानाची 'आऊटफिल्ड' पाहता खेळाडूंवर फिल्डिंग करताना 'धर्मसंकट' येण्याची चिन्हे
Dharamsala : अफगाणिस्तानच्या मुजीब-उर-रहमानने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा गुडघा आऊटफिल्डमध्ये अडकला. यावेळी चिखल वर आल्याने विचित्रपणे कोसळला.
धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : वर्ल्डकपमधील (World Cup) पहिली लढत बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान हिमाचल प्रदेशातील धर्मशाला मैदानावर (outfield at the HPCA stadium in Dharamsala) पार पडली. धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमच्या आउटफिल्डची स्थिती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येलाही आउटफिल्ड खराब आणि पुरेशी गवत कव्हर नसलेली दिसत होती. त्यामुळे आजच्या सामन्यात दुखापतीचे प्रसंग घडले. अफगाणिस्तानच्या मुजीब-उर-रहमानने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा गुडघा आऊटफिल्डमध्ये अडकला. यावेळी चिखल वर आल्याने विचित्रपणे कोसळला.
अफगाणिस्तान संघ व्यवस्थापनाच्या एका सदस्याने क्रिकबझ या क्रीडा वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत हे ठिकाण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार नाही. पाहून वाईट वाटतं. क्रिकेट खेळण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे, पण आउटफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार नाही. कदाचित पावसामुळे असेल, पण योग्य नाही. क्युरेटरने भरपूर पाऊस झाला आहे. असेच चालू राहिल्यास, कोणीतरी जखमी होईल. कोणालाही डाईव्ह करून सरकायचे नसतं, पण क्रिकेटमध्ये तुम्हाला ते करता आले पाहिजे, असे म्हणाल्याचे त्याने सांगितले.
भारत 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी खेळणार
आउटफिल्ड संकटात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी मैदानात 'हिरवळीची घनता नसल्यामुळे' बाहेर हलवण्यात आली होती. सप्टेंबरच्या मध्यात, आऊटफिल्डवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याची नोंद झाली होती. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीनंतर या मैदानावर पुढील सामना बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारत येथे 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी खेळणार आहे. त्यामुळे सामने हलवले जातात का? याकडे आता लक्ष आहे. अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी सांगितले की, परिस्थिती अशी होती की खेळाडूंना डाईव्ह करता येईल की नाही याची खात्री नव्हती आणि मुजीबला गंभीर दुखापत झाली नाही हे भाग्याचे होते.
बांगलादेशची वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी
दुसरीकडे, याच मैदानावर आज (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानवर (Bangladesh vs Afghanistan) सहा विकेट्स राखून विजय मिळवत वर्ल्डकपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) शानदार सुरुवात केली. बांगलादेशने वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला अवघ्या 156 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 34.4 षटकामध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले. बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार मेहदी हसन मिराझ ठरला. त्याने तीन गडी बाद करतानाही शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे बांगलादेशला विजयाच्या समीप गेला. नजमूल शांतोने नाबाद 59 धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली.
इतर महत्वाच्या बातम्या