एक्स्प्लोर
टेनिसस्टार सेरेनाची महिलांसाठी हृदयस्पर्शी कविता
न्यूयॉर्क (अमेरिका): टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने एक खेळाडू असण्यासोबतच एक जागृत महिला असल्याचंही दाखवून दिलं आहे. सेरेनाने महिलांचं दुःख मांडणारी एक संवेदनशील कविता न्यूयॉर्क फॅशन शोवेळी सादर केली. सेरेनाची ही कविता ऐकून उपस्थितांचे डोळे पानावले.
रिओ ऑलिम्पिक आणि यूएस ओपन या स्पर्धांच्या काळात ही कविता सेरेनाने लिहिली. महिला सशक्तिकरणासाठी ही कविता लिहिली असल्याचं सेरेनाने सांगितलं. सेरेनाने ही कविता प्रेक्षकांना साऊंड ट्रॅकच्या माध्यमातून ऐकवली.
अशी आहे कविता
''ती आपल्या निराशेचं विजयात रुपांतर करते.. स्वतःला नाकारण्याच्या भीतीने ती आपल्या दुःखाला आनंदाचं रुप देते. तिच्यावर कोणाला विश्वास नसेल तर तिला फरक पडत नाही, कारण तिला स्वतःवर विश्वास आहे. कोणी तिला थांबवू शकत नाही, कोणी तिला हात लावू शकत नाही.. कारण ती एक महिला आहे..''
... म्हणून कविता लिहिली- सेरेना
एक महिला अॅथलीट म्हणून कसं वाटतं, असा प्रश्न सेरेनाला अनेक ठिकाणी विचारला जातो. पण पुरुषांना कोणी असा प्रश्न कधी विचारत नाही. त्यामुळे महिला सशक्तीकरणाला आवाज देण्याच्या हेतूने ही कविता लिहिली असल्याचं सेरेनाने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement