टेनिस स्टार सानिया मिर्झा आता नव्या भूमिकेत! वेब सीरिजद्वारे करणार डेब्यू
सानिया मिर्झा डिजिटल प्लॅटफॉर्मवर नवा लुक घेणार आहे5 एपिसोडची मालिका नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे.

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आता नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सानिया लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. सानिया 'एमटीव्ही निषेध अलोन टूगेदर' या वेब सीरिजद्वारे डेब्यू करणार आहे. या शोचा हेतू टीबीविषयी जनजागृती करणे आहे. यात सानिया स्वत: दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
टेनिस स्टार सानिया मिर्झाचा नवीन अवतार
सानियाने एका निवेदनात म्हटले आहे की, "टीबी हा आपल्या देशातील सर्वात जुनी आरोग्य समस्या आहे. टीबीची नोंद केलेली निम्मी प्रकरणे ही 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आहेत. रोगाचा सामना करण्याची लोकांची टीबी विषयीचे गैरसमज दूर करण्याची नितांत गरज आहे. "ती पुढे म्हणाली, की 'एमटीव्हीवरील निषेध अलोन टूगेदर प्रभावी पद्धतीने लोकांना जागरुक करत आहे. आजचे तरुण अधिक जागरूक, संवेदनशील असल्याचे सानिया म्हणाली.
डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फत जनजागृती करणार
सध्याच्या साथीच्या आजारांमुळे टीबीचा धोका अधिक वाढला आहे. परिणामी टीबी विरोधातील लढाई पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे. यामुळे मला या प्रकल्पात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. मला आशा आहे की माझ्या प्रयत्नामुळे काही सकारात्मक बदल घडतील. "विकी आणि मेघा या तरुण जोडप्यांच्या आव्हानांबद्दल हा शो आहे. विकीची भूमिका सय्यद रझा आणि मेघाची भूमिका प्रिया चौहान यांनी केली आहे.
Women's t20 challenge 2020 | ट्रेलब्लेझर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद, सुपरनोव्हाजवर 16 धावांनी विजय
शोमध्ये सानिया मिर्झा लॉकडाऊन दरम्यान तरुण जोडप्यांना होणा होणाऱ्या आव्हानांवर चर्चा करताना दिसणार आहे. 5 एपिसोडची मालिका नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एमटीव्ही इंडिया आणि एमटीव्ही निषेधच्या सोशल मीडिया हँडलवर सुरू होईल. यावर्षी जानेवारीत टीव्ही शो एमटीव्ही निषेधचा प्रीमियर झाला होता. शोमध्ये टीबीविषयी जागरूकता आणि योग्य औषधे घेण्याचे महत्त्व दर्शविले गेले, विशेषत: कोविड -19 च्या संदर्भात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
