एक्स्प्लोर

Maria Sharapova | रशियाच्या मारिया शारापोव्हाची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती

मारिया शारापोव्हाने बुधवारी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शारापोव्हाच्या खजिन्यात पाच ग्रँडस्लॅम विजेतीपदं आहेत. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये शारापोव्हाने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं होतं.

मुंबई : रशियाची प्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोव्हाने बुधवारी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या 32व्या वर्षी शारापोव्हा टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. शारापोव्हाच्या खजिन्यात पाच ग्रँडस्लॅम विजेतीपदं आहेत. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये शारापोव्हाने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं होतं. वोग आणि वॅनिटी फेअर मॅगझिनसाठीच्या एका लेखात म्हटलं की, मी टेनिसला गूड बाय करत आहे. 28 वर्ष आणि पाच ग्रँडस्लॅमनंतर मी आता वेगळ्या स्पर्धेसाठी तयार आहे. शारापोव्हाने वयाच्या चौथ्या वर्षापासून हातात टेनिसच रॅकेट हाती घेतलं होतं.

शारापोव्हाने लेखात म्हटलं की, मी माझं आयुष्य टेनिसला दिलं आणि टेनिसने मला आयुष्य दिलं. मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी या गोष्टी मला आठवतील. माझी ट्रेनिंग आणि दिनक्रम मला आठवेन. सकाळी उठालचं.. उजवा बूट पहिल्यांदा घालणे.. टेनिस कोर्टचा दरवाजा बंद करणे आणि नंतर दिवसांचा पहिला बॉल हिट करणे.. या सर्व गोष्टी मी कधीच विसरणार नाही. माझे प्रशिक्षक आणि माझ्या संपूर्ण टीमची मला आठवण येईन. सामन्याचा निकाल काहीही असो, मी जिंकलेली असो किंवा हरलेली असो मात्र सामन्यानंतर माझ्या प्रतिस्पर्ध्याला हात मिळवणे हे नेहमी माझ्या स्मरणात राहील.

मारिया शारापोव्हाची टेनिस कारकिर्द

शारापोव्हा सध्या 369 व्या स्थानावर आहे. मात्र 22 ऑगस्ट 2005 रोजी शारापोव्हा टेनिस रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होती. विम्बलडनच्या रुपाने 2004 मध्ये शारापोव्हाने आपलं पहिलं ग्रँडस्लॅम जिंकल होतं. त्यानंतर 2006 मध्ये यूएस ओपन, 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 आणि 2014 मध्ये फ्रेंच ओपनवर शारापोव्हाने आपलं नाव कोरलं. शारापोव्हाच्या नावे 36 डब्लूटीएचे आणि चार आटीएफचे खिताब आहेत.  विम्बलडन 2014 मध्ये अवघ्या 17 व्या वर्षी स्टार टेनिसपटू आणि त्यावेळची नंबर वन सेरेना विलियम्सवर शारापोव्हाने मात केली होती. ते शारापोव्हाचं पहिलं ग्रँडस्लॅम होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Nikalje : छोटा राजनचे बंधू विधानसभेच्या मैदानात भिडणार शिंदे-ठाकरेंच्या उमेदवाराला !Raj Thackeray Bag Check : सोलापूर दौऱ्यावर राज ठाकरेंच्या बॅगची तपासणी,व्हिडीओ समोरBullet Patil Exclusive | 26 वर्ष पोलीस आता राजकारणात एन्ट्री; बुलेट पाटलांची बुलेटवर मुलाखतBJP Vastav 104 : Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणं भाजप नेते का टाळतायत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
विधानसभेची खडाजंगी: बहिणीच्या साथीने वाढली भावाची ताकद; परळी मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार?
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट
काल शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट झाला आज अमोल मिटकरींनी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, काय घडलं?
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Embed widget