(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे.
Bjorn Borg : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीनं ब्योर्न बोर्गचा आणि विजय अमृतराज यांचा सन्मान करण्यात येणार होता. मात्र, बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यानं ब्योर्न बोर्ग यांनी सन्मान नाकारला आहे. 21 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे आयोजनं केलं होतं.
ब्योर्न बोर्ग 11 ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू
कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीनं एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने आणि विजय अमृतराज यांचा सन्मान करण्यात येणार होता. मात्र, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या कार्यक्रमाला येण्यास तब्बल 90 मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाला. त्यामुळं ब्योर्न बोर्गने यांनी सन्मान स्वीकारण्यास नकार दिला. स्वीडिश टेनिसपटू ब्योर्न बोर्ग यांनी 11 ग्रँड स्लॅम जिंकली आहेत. बंगळुरु ओपन एटीपी चॅलेंजरमध्ये त्यांचा मुलगा लिओ बोर्ग खेळत आहे. त्याचा खेळ पाहण्यासाठी ब्योर्न बोर्ग बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीन त्यांच्या सन्मानाचे आयोजन केलं होते.
आयोजकांवर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ
21 फेब्रुवारी सकाळी साडेनऊ वाजता भारताचा टेनिटपटू विजय अमृतराज आणि ब्योर्न बोर्ग यांचा सन्मान करण्यात येणार होता. मात्र, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर होणार असल्यामुळं हा कार्यक्रम 10.15 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. मात्र 11 वाजले तरी कार्यक्रम सुरू झाला नाही. अशातच ब्योर्न बोर्गचा मुलगा लिओ बोर्गचा सामना सकाळी 11 वाजता होणार होता. त्याचे वडील ब्योर्न बोर्ग सामना पाहण्यासाठी गॅलरीत बसले होते. सामना सुरु झाल्यानंतर काही मिनिटांत मुख्यमंत्री बोम्मई येथे पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई आल्याची माहिती ब्योर्न बोर्ग यांना देण्यात आली. मात्र, त्यांनी सामना संपल्यानंतरच सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहू असे सांगितले. त्यामुळं आयोजकांना सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्यास भाग पडले.
महत्त्वाच्या बातम्या: