एक्स्प्लोर
भारत 2019 ते 2023 दरम्यान घरच्या मैदानात 81 सामने खेळणार!
बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा साल 2023 पर्यंतचा कार्यक्रम ठरला आहे. सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघ घरच्या मैदानात 81 सामने खेळणार आहे. जे सध्याच्या भविष्य दौरा कार्यक्रम म्हणजे एफटीपीपेक्षा 30 सामने जास्त आहेत.
बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढच्या एफटीपीमध्ये भारतीय संघ घरच्या मैदानात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांशी भिडणार आहे.
अफगाणिस्तानची पहिली कसोटी मालिका टीम इंडियाविरोधात
अफगाणिस्तान क्रिकेट संघाला येत्या जून महिन्यात कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर 2019-2020 च्या मोसमात अफगाणिस्तान आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान संघांमधला हा कसोटी सामना भारतात खेळवण्यात येईल. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणार होता. पण भारत आणि अफगाणिस्तानमधील ऐतिहासिक नातेसंबंध लक्षात घेता बीसीसीआयने अफगाणिस्तानला पहिल्या कसोटी सामन्याचं निमंत्रण दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement