एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी शिखर धवनबाबत अंतिम निर्णय : सूत्र
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी (9 जून) झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमधून लवकर सावरण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे टीम इंडिया लवकरच दुखापतग्रस्त शिखर धवनविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात शिखर धवनच्या दुखापतीविषयी पुन्हा परीक्षण केलं जाईल. त्यानंतर संघाचे फिजिओ पॅट्रिक फारहार्ट धवनच्या खेळण्याविषयी अंतिम निर्णय घेतील. अफगाणिस्तानविरुद्धच्या (22 जून) सामन्याआधीच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
रिषभ पंतचा कसून सराव
दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला रवाना झालेला रिषभ पंत जोमाने सराव करत आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनचा संभाव्य पर्याय म्हणून युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या नावाची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. पण खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याला विश्वचषक मोहिमेवर पाठवण्यात आलं आहे.
रिषभ पंतने एक धडाकेबाज फलंदाज म्हणून अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. त्याला विश्वचषकाच्या पंधरासदस्यीय संघातून डावलण्यात आल्याने अनेक जाणकारांनी नाराजी व्यक्त केली होती. पण धवनच्या दुर्दैवी दुखापतीने आता रिषभ पंतसाठी भारताच्या विश्वचषक संघाचं दार उघडलं आहे.
शिखर धवनला दुखापत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी (9 जून) झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडून धवनच्या अंगठ्याला लागला. अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं. नॉटिंग्घममध्ये आज झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
संबंधित बातम्या
ICC World Cup 2019 : हम परों से नहीं हौंसलों से उड़ते हैं, दुखापतीनंतर धवनचं ट्वीट
ICC World Cup 2019 : रिषभ पंत इंग्लंडला रवाना, धवनच्या जागी संधी मिळण्याची शक्यता
ICC World Cup 2019 : विश्वचषकात टीम इंडियाला झटका, शिखर धवन तीन आठवड्यांसाठी बाहेर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement