एक्स्प्लोर
'3D' मुळे द. आफ्रिकेची अडचण वाढली, भारत इतिहास रचणार?
कसोटीत 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला असला तरी सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत 2-0 ने आघाडीवर आहे.
केपटाऊन : भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात केपटाऊनच्या न्यूलँड्समधून केली होती. जर्सी आणि फॉरमॅट बदलल्यानंतर उभय संघ पुन्हा एकदा याच मैदानात भिडणार आहेत. मात्र यावेळी भारताचं पारडं जड आहे. कसोटीत 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला असला तरी सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत 2-0 ने आघाडीवर आहे.
'3D' मुळे दक्षिण आफ्रिकेची अडचण वाढली
पहिल्या दोन्ही वन डे सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. मालिकेपूर्वीच महत्त्वाचा खेळाडू एबी डिव्हिलियर्स दुखापतीमुळे बाहेर गेला, पहिल्या वन डे सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसलाही दुखापत झाली. तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तर तिसऱ्या वन डे पूर्वी यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकला दुखापत झाली आहे. त्यामुळे डी कॉकही आता उर्वरित वन डे सामने आणि टी-20 मालिकेला मुकणार आहे.
भारतीय फिरकीपटू जोडीसमोर दक्षिण आफ्रिका हतबल
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीसमोर सपशेल लोटांगण घातलं आहे. दोन्ही सामन्यांमध्ये या दोन्ही फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेच्या 13 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात तर यजुवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ एकट्याने माघारी पाठवला.
भारताकडे इतिहास रचण्याची संधी
डर्बन आणि सेन्चुरियनमध्ये विजय मिळवल्यानंतर आता भारताकडे इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळताना द्विपक्षीय मालिकेत भारताने आतापर्यंत कधीही दोन पेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत. यापूर्वी भारतीय संघाने 1992 साली 7 सामन्यांनी वन डे मालिका 2-5 ने गमावली होती. तर 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र सध्याच्या भारतीय संघाच्या कामगिरीचा विचार करता इतिहास रचण्याची संधी आहे.
संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.
दक्षिण आफ्रिका : एडिन मार्कराम (कर्णधार), हाशिम आमला, जेपी ड्यूमिनी, फरहान बेहरदीन, इमरान ताहिर, हेइनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्कल, ख्रिस मॉरिस, लुंगी एनगिडी, आंदिले फेहुलकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायेलिह्ले जोंडो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement