IND vs PAK Final: भारतानं पाकिस्तानला लोळवलं, हॉकीचा ज्युनिअर आशिया कप जिंकला, अंतिम फेरीत 5-3 नं विजय
Men's Junior Asia Cup 2024 Final: भारतानं ज्युनिअर आशिया कप स्पर्धा 2024 जिंकली आहे. भारतानं पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवलं.
IND vs PAK Final Men's Junior Asia Cup 2024: भारतानं पाकिस्तानला ज्युनिअर आशिया कप स्पर्धेत अंतिम फेरीत पराभूत करत विजेतेपद मिळवलं आहे. पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडियाच्या हॉकी संघानं विजेतेपद मिळवलं आहे. भारतासाठी अरायजीत सिंह यानं चार गोल केले. भारताच्या दिलराज सिंह यानं एक गोल केला. भारतानं अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटापर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. त्यानंतर भारतीय संघानं बाजी मारली. भारतानं ही स्पर्धा पाचव्यांदा जिंकली आहे.
या मॅचमध्ये पहिला गोल पाकिस्ताननं केला होता. पहिल्या क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटाला हनान शाहित यानं गोल केला. त्यानंतर लगेचच भारतानं कमबॅक केलं. टीम इंडियासाठी चौथ्या मिनिटाला अरायजीत सिंह यानं पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. पहिल्या क्वार्टरच्या शेवटी दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते.
भारताकडे दुसऱ्या क्वार्टरमध्ये आघाडी
टीम इंडियाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आघाडी मिळवली होती. अरायजीत यानं आणखी एक पेनल्टी कॉर्नर यशस्वी करत गोल केला. यामुळं भारताला 2-1 अशी घाडी मिळाली. यानंतर दिलराज सिंह यानं 19 व्या मिनिटाला गोल करत 3-1 अशी आघाडी मिळवली. यानंतर पाकिस्तानकडून गोल करण्यात आला. सूफियान खान यानं 30 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळं दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस भारताकडे 3-2 अशी आघाडी होती.
भारतानं पाकिस्तानला लोळवलं
पाकिस्ताननं तिसऱ्या क्वार्टरमध्ये वर्चस्व मिळवलं. सूफियान खान यानं 39 व्या मिनिटाला गोल केला. पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरित करण्यात तो यशस्वी ठरला. तिसरं क्वार्टर संपलं तेव्हा दोन्ही संघ 3-3 अशा बरोबरीत होते. भारतानं चौथ्या क्वार्टरमध्ये कमबॅक केलं आणि मॅच जिंकली. टीम इंडियासाठी अरायजीतनं 47 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यानंतर पुन्हा एकदा 54 व्या मिनिटाला त्यानं गोल केला. यामुळं भारतानं पाकिस्तानला 5-3 असं पराभूत केलं.
भारतानं पाचव्यांदा मिळवलं विजेतेपद
टीम इंडियानं सलग दुसऱ्यांदा ज्युनिअर आशिया कप जिंकला आहे. भारतानं 2023 मध्ये देखील विजेतेपद मिळवलं होतं. याशिवाय भारतानं 2004,2008 आणि 2015 मध्ये देखील विजेतेपद मिळवलं होतं.
इतर बातम्या :
विनोद कांबळींनी सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंसमोर गायलं गाणं; आचरेकरांच्या आठवणीत सर्व भावूक