विराटची कर्णधारपदावरून होणार हकालपट्टी? T20 World Cup च्या कामगिरीवर विराट कोहलीचे भविष्य
विराट कोहली फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त भारतात नाही तर जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. परंतु कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ लिमिटेड ओव्हर्सच्या स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरत आहे.
T20 World Cup : ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये टी20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकाचे नेतृ्त्त्व भारताकडे आहे. दरम्यान टी-20 वर्ल्डकप जिंकण्यात जर भारतीय संघ अपयशी ठरला तर मर्यादित ओव्हर्सचे कॅप्टन विराट कोहलीचे कर्णधार पद काढून घेतले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
विराट कोहली फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त भारतात नाही तर जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. परंतु कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ लिमिटेड ओव्हर्सच्या स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरत आहे. कोहली नेतृत्त्वात भारताने एकही आयसीसी टूर्नांमेट आपल्या नावावर केलेली नाही.
क्रिकेटएडिक्टक डॉट कॉम या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये टी20 वर्ल्डकपचे विराट कोहली नेतृत्त्व करणार आहे. मजबूत टीम असताना देखील आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश मिळत असल्याने कर्णधारपद जाण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीसीसीआय कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल चिंतित
रिपोर्टमध्ये पुढे असे देखील म्हटले आहे की, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिमिटेड ओव्हर्सच्या कर्णधारपदाच्या भविष्याविषयी विराटशी चर्चा देखील केली आहे. एवढच नाही तर बीसीसीआय डब्लूटीसी फायनलमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या संघ निवडीवर नाखूष होते या सामन्यात कोहलीने वेगवान गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवले.
विराट कोहली टी20 वर्ल्ड कपनंतर कसोटी सामन्याचा कर्णधार असणार हे निश्चिच आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स पाच वेळा विजयी ठरली आहे. त्यामुळे मर्यादित ओव्हर्ससाठी रोहित शर्माचा नाव पुढे येत आहे.