एक्स्प्लोर

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, धोनीकडे मोठी जबाबदारी

T20 World Cup, Team India Players List: बीसीसीआयने 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2021 टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Indian Team for T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) खेळल्या जाणाऱ्या 2021 टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय बीसीसीआयने तीन स्टँडबाय खेळाडूंची निवड केली आहे, जे टीम इंडियासोबत जातील. त्याचबरोबर बीसीसीआयने माजी कर्णधार एमएस धोनीवर वर्ल्डकपची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ( Team India schedule T20 World Cup) टी -20 विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. यानंतर, टीम इंडिया 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड, 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान आणि 5 नोव्हेंबर रोजी सुपर 12 मध्ये पात्रता संघ (बी -1) यांच्याशी सामना करेल.

धवन, चहल आणि अय्यरसह या खेळाडूंना स्थान नाही
शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा 15 जणांच्या भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, अय्यरला स्टँडबाय प्लेअरमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीमुळे या संघाचा भाग नाही. आश्चर्य म्हणजे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही.

अश्विन संघात परतला
यूएईच्या खेळपट्ट्या लक्षात घेऊन बीसीसीआयने फिरकी गोलंदाज आणि फिरकी अष्टपैलूंना महत्त्व दिले आहे. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि राहुल चहर हे देखील या संघाचा भाग आहेत. यासोबतच मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ (15 Member Indian Team Squad for T20 World Cup)

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (व्हीसी), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी. 

धोनी मार्गदर्शक असेल
बीसीसीआयने 2021 टी 20 विश्वचषकासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियाच्या मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. असे मानले जाते की विश्वचषकासाठी 15 जणांची टीम निवडण्यातही धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Embed widget