T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला.
![T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम T20 World Cup 2022: Virat Kohli, Rohit Sharma in Team India net session in Sydney T20 World Cup 2022: पुढच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा नेटमध्ये जबरदस्त सराव; रोहित शर्मासह स्टार खेळाडूंनी मैदानात गाळला घाम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/25/abba12f369f1b8a03dc6f8b804677d3e1666694808903266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2022: भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियानं (Team India) त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. त्यानंतर भारतीय संघ गुरुवारी (27 ऑक्टोबर) सिडनीमध्ये (Sydney) नेदरलँड्सविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे.या सामन्यासाठी भारतीय संघ सिडनीत दाखल झालाय.नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी मंगळवारी 25 ऑक्टोबरला पहिल्या सराव सत्रात टीम इंडियानं जबरदस्त सराव केलाय.
या सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर केएल राहुल लयीत दिसले. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. पाकिस्तानविरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेल्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. सराव सत्रादरम्यान भारतीय फलंदाजांसह गोलंदाज मैदानात घाम गाळताना दिसले. दिनेश कार्तिक आणि केएल राहुल यांनी भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि युझवेंद्र चहलचा गोलंदाजीवर सराव केला. यावेळी ऋषभ पंतही सराव करताना दिसला. हे संपूर्ण सराव सत्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली पार पडले. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यापूर्वी सराव सत्रात सूर्यकुमार यादव आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दिसला नाही. यासह भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह यांनी देखील विश्रांती घेतली.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर.
नेदरलँड संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन एकरमॅन, शारिज अहमद, लोगान वॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोवर, टिम वॅन डेर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल वॅन मीकेरेन, रोएलोफ वॅन डेर मेर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा निदामानुरु, मॅक्स ओ'डॉड, टीम प्रिंगल, विक्रम सिंह.
ट्वीट-
Hello Sydney 👋
— BCCI (@BCCI) October 25, 2022
We are here for our 2⃣nd game of the #T20WorldCup! 👏 👏#TeamIndia pic.twitter.com/96toEZzvqe
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)