एक्स्प्लोर

T20 World Cup : भारत-न्यूझीलंडमधील सामन्याची प्रतीक्षा, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांचा पाकिस्तानकडून पराभव

IND vs NZ : टी20 विश्‍वचषक 2021 मध्ये टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय टीम दुसऱ्या सामन्याच्या तयारीला लागली आहे.

IND vs NZ : टी20 विश्‍वचषक 2021 मध्ये टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय टीम दुसऱ्या सामन्याच्या तयारीला लागली आहे. 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरोधात हा सामना होणार आहे. हा सामना देखील दुबईच्याच स्टेडियमवर होईल जिथं भारताचा पहिला सामना झाला होता. भारताला पाकिस्ताननं पहिल्या सामन्यात इथंच पराभूत केलं होतं. आता न्यूझीलंडकडूनही इथं मोठं आव्हान आहे. भारताला हा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. या सामन्यात जर पराभव झाला तर भारताची पुढील वाटचाल खडतर असेल. दुसरीकडे काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा देखील पाकिस्ताननं पराभव केला आहे. त्यामुळं न्यूझीलंड देखील हा सामना जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. 

Pakistan vs New Zealand: पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 5 विकेट्सने विजय, भारताला फायदा की तोटा?

भारतीय संघ आणि न्‍यूझीलंड 16 टी20 इंटरनेशनल सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यातील आठ-आठ सामने दोन्ही संघानं जिंकले आहेत. याचा अर्थ दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.   टी20 विश्‍वचषकात दोन सामने दोन्ही संघात झाले असून दोन्ही सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. त्यामुळं न्यूझीलंडचं पारडं जड असणार आहे.  2019 च्या विश्‍वचषकात सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाला पराभूत केलं होतं. यंदाच्या विश्‍व टेस्‍ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये देखील न्यूझीलंडच्या संघानं भारताला हरवलं आहे. 

सध्याच्या विश्वचषकात मात्र दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली आहे. काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडला पाच विकेट्सने हरवलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 विकेट्स गमावून 134 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेले लक्ष्य पाकिस्तानने 19 व्या षटकात पूर्ण केले. या विजयासह पाकिस्तानच्या संघाचे एकूण 4 गुण झाले आहेत. विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीत भारतीय संघ 'ब' गटात आहे. दरम्यान, न्यूझीलंडला पराभूत करून पाकिस्तान 'ब' गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याआधी पाकिस्ताननं भारताचा दहा विकेट्सने पराभव केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget