IND Vs PAK, T20 World Cup 2021: हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा दारूण पराभव, विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात विराटसेना अपयशी
T20 World Cup, Ind vs Pak LIVE: आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होतेय. या सामन्याविषयी सर्व काही या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
टी-20 विश्वचषकातील 16 व्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवून गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. याआधी पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले आहे.
टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 16 व्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर (Dubai International Stadium) हा सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी 152 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 57 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानविरुद्ध भारताने पाचवी विकेट्स गमावली आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा 13 धावा करून माघारी परतला आहे. भारताची धावसंख्या- 127/5 (18)
टी-20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक ठोकले आहे. भारताची धावसंख्या- 116/4 (17.1)
पाकिस्तान विरुद्ध भारताने शंभर धावांचा टप्पा गाठला आहे. भारताने 15 व्या षटकात शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानात असून पुढील षटकांत धावांचा वर्षाव पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारताची धावसंख्या- 100/4 (15)
भारताला चौथा झटका लागला असून शादाब खानच्या गोलंदाजीवर रिषभ पंत आऊट झाला आहे. त्याने 30 चेंडूवर 39 धावा केल्या. भारताची धावसंख्या- 87/4 (13)
पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल यांच्या पाठोपाठ सुर्यकुमार यादवनेही आपली विकेट्स गमावली आहे. भारतीय संघाला सावरण्यासाठी आणि कर्णधार विराट कोहलीची साथ देण्यासाठी रिषभ पंत मैदानात आला आहे. रिषभ पंतकडून चागंल्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. भारताची धावसंख्या- 41/3 (7.4)
भारतीय संघाला तिसरा झटका लागला आहे. पाकिस्तानच्या हसन अलीच्या गोलंदाजीवर सुर्यकुमारने विकेट्स गमावली आहे. सुर्यकुमारला 8 चेंडून 11 धावा करता आल्या आहेत.
रोहित शर्मानंतर भारताला दुसरा झटका बसला असून केएल राहुल त्रिफळाचित झाला आहे. भारताच्या दोन विकेट्सच्या बदल्यात सहा धावा झाल्या आहेत.
भारताला पहिला झटका बसला असून सलामीविर रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दुबईच्या मैदानावर आज हा सामना रंगणार आहे. हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षांनी एकमेकांशी भिडणार आहेत. यापूर्वी, आयसीसीने भारत- पाकिस्तान यांच्यात याआधी झालेल्या थरारक सामन्यांचा एक थरारक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. व्हिडीओ-
तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar) वर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याशिवाय https://marathi.abplive.com/ वर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स मिळतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहू शकाल. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, हे इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहिले जाऊ शकते.
आयसीसी टी -20 विश्वचषकात, भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येतील. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार आहे.
T20 WC 2021 IND vs PAK: टीम इंडिया रविवारी 24 ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करून T20 विश्वचषक (T20 WC 2021) मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या हाय-व्होल्टेज मॅचवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे भारत वर्ल्डकपमध्ये (वनडे आणि टी -20) पाकिस्तानकडून पराभूत झाला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रविवारी टीम इंडिया हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आम्ही या सामन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देत आहोत.
भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित झाली आहे. फिरकी गोलंदाज कुणाला घ्यायचं, हा प्रश्न कदाचीत विराटला सतावत असेल. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं हार्दिक पांड्या खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राहुल, रोहित, विराट, सूर्यकुमार, पंत आणि हार्दिक पांड्या या आघाडीच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधात खेळताना तुम्ही पाहू शकता. हार्दिक पांड्याला एका रात्रीत पर्याय शोधणं कठीण आहे. गरज भासल्यास तो दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
सामन्यापूर्वी विराट कोहलीनं म्हटलं आहे की, आम्ही विजयासाठी पूर्णपणे सकारात्मक आहोत. या सामन्याला आम्ही इतर सामन्यासारखंच पाहात आहोत. मला माहितीय की, बाहेर या सामन्याची खूप चर्चा आहे. पण आम्ही याबाबत जास्त विचार करत नाहीयेत. आमच्यासाठी हा सामना नेहमीसारखाच एक सामना आहे. ज्यात आम्ही नेहमीसारखं उत्तम खेळू. मैदानाबाहेर फार उत्साह, जोश असेल. पण खेळाडू म्हणून आम्ही पूर्ण ताकतीनं उतरु, असं विराट म्हणाला.
T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
पार्श्वभूमी
T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
IND vs PAK : हाय-होल्टेज ड्रामा, विराटसेनेला बाबर रोखणार? भारतीय संघ पुन्हा साधणार 'मौका'
सामन्यापूर्वी विराट कोहलीनं म्हटलं आहे की, आम्ही विजयासाठी पूर्णपणे सकारात्मक आहोत. या सामन्याला आम्ही इतर सामन्यासारखंच पाहात आहोत. मला माहितीय की, बाहेर या सामन्याची खूप चर्चा आहे. पण आम्ही याबाबत जास्त विचार करत नाहीयेत. आमच्यासाठी हा सामना नेहमीसारखाच एक सामना आहे. ज्यात आम्ही नेहमीसारखं उत्तम खेळू. मैदानाबाहेर फार उत्साह, जोश असेल. पण खेळाडू म्हणून आम्ही पूर्ण ताकतीनं उतरु, असं विराट म्हणाला.
MS Dhoni : 'मेन्टॉर'सिंह धोनीच्या नव्या इनिंगकडे लक्ष, डगआऊटमधून टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य करणार
भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित
भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित झाली आहे. फिरकी गोलंदाज कुणाला घ्यायचं, हा प्रश्न कदाचीत विराटला सतावत असेल. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं हार्दिक पांड्या खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राहुल, रोहित, विराट, सूर्यकुमार, पंत आणि हार्दिक पांड्या या आघाडीच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधात खेळताना तुम्ही पाहू शकता. हार्दिक पांड्याला एका रात्रीत पर्याय शोधणं कठीण आहे. गरज भासल्यास तो दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. विराटच्या या वक्तव्यावरुन भारतीय संघ पाच गोलंदाज आणि सहा फलंदाज या सुत्राने मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेय. दोन फिरकी आणि तीन वेगवान अशा पाच गोलंदाजांसह भारत खेळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रविंद्र जाडेजा, बुमराह आणि शामीचं स्थान निश्चित मानलं जात आहे. जाडेजासोबत दुसरा फिरकी गोलंदाज कोण? अनुभवी अश्विन की वरुण चक्रवर्ती अन् राहुल चहर यांची वर्णी लागणार... एका जागेसाठी या तीन गोलंदाजामध्ये कडवी चुरस पाहायला मिळेल. उर्वरित एका वेगवान स्थानासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर यांच्यात चुरस आहे.
भारताविरोधात पाकिस्तानचा संघ (अंतिम 12) : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -