एक्स्प्लोर
Asia Cup : बांगलादेशचं भारताला 174 धावांचं आव्हान
दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याऐवजी या सामन्यात समावेश करण्यात आलेल्या रवींद्र जाडेजानं 29 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं.
अबुधाबी: आशिया चषकाच्या सुपर फोरमधल्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी बांगलादेशने केवळ 174 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशची अवस्था सर्वबाद 173 अशी केली होती.
दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याऐवजी या सामन्यात समावेश करण्यात आलेल्या रवींद्र जाडेजानं 29 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा या दोघांनीही प्रत्येकी तीन फलंदाजांच्या विकेट्स काढल्या.
आशिया चषकाच्या सुपर फोर साखळीत भारताचा सामना बांगलादेशशी होत आहे. आशिया चषकाच्या साखळीत पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानं टीम इंडियाचं मनोधैर्य उंचावलेलं असलं तरी, दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या भारतीय संघाची चिंतेची बाब बनली आहे.
बांगलादेशने यापूर्वी अनेकवेळा सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो शेअर करत, भारताला डिवचलं होतं. त्यातच या वर्षाच्या सुरुवातील श्रीलंकेत झालेल्या तिरंगी टी ट्वेण्टी मालिकेत, बांगलादेशने श्रीलंकेला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी नागीन डान्स करुन उन्मादी उत्सव साजरा केला होता. मात्र फायनलमध्ये दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताने बांगलादेशचा विजयी घास हिसकावला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर भारत आज बांगलादेशला हरवून नागीन डान्स करणार का हे पाहावं लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या प्रतिस्पर्धी संघांची हवा काढून घेणारा संघ म्हणून बांगलादेशची ख्याती आहे. आशिया चषकाच्या साखळीतही बांगलादेशने श्रीलंकेचा धक्कादायक पराभव करून आपला लौकिक कायम राखला. त्यामुळे टीम इंडियाला सुपर फोर साखळीत बांगलादेशचं आव्हान कमी लेखता येणार नाही. सुपर फोर साखळीत भारत-पाकिस्तान सामना रविवारी (23 सप्टेंबर) आणि भारत-अफगाणिस्तान सामना मंगळवारी (25 सप्टेंबर) खेळवण्यात येईल.
सुपर फोर
आशिया चषकाच्या अ गटातून भारत आणि पाकिस्तान, तर ब गटातून बांगलादेश आणि अफगाणिस्ताननं सुपर फोर साखळीत धडक मारली आहे. सुपर फोर साखळीत चारही संघ एकमेकांशी खेळणार आहेत. या साखळीत भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होत आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमधला सुपर फोरचा दुसरा सामना रविवारी म्हणजे अनंत चतुर्दशीला खेळवण्यात येईल. भारताचा तिसरा सामना अफगाणिस्तानशी होईल. तो सामना येत्या मंगळवारी होईल.
धोकादायक बांगलादेश
आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीत पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानं टीम इंडियाचं मनोधैर्य उंचावलेलं असलं तरीही, बांगलादेशच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या बड्या संघांची हवा काढून घेणारा संघ म्हणून बांगलादेशची ख्याती आहे. दस्तुरखुद्द टीम इंडियानं बांगलादेशकडून ढाक्यात चारवेळा आणि 2007 सालच्या विश्वचषकात एकदा पराभवाची कटू चव चाखली आहे.
VIDEO : रुबेल हुसेनची धुलाई आणि सुनील गावसकरांचा नागीन डान्स
त्यात सुपर फोरच्या वेळापत्रकात आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून झालेल्या अन्यायामुळं बांगलादेशचा संघ आणि त्यांचे पाठीराखे प्रचंड चिडले आहेत. बांगलादेशला अफगाणिस्तानविरुद्धच्या अबुधाबीतल्या सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताशी दुबईत खेळायचं आहे. टीम इंडियाही प्राथमिक साखळीत लागोपाठ दोन दिवसांत हाँगकाँग आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळली. पण ते दोन्ही सामने एकाच शहरात म्हणजे दुबईत होते. पण बांगलादेशला अबुधाबीतला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना आटपून भारताशी खेळण्यासाठी दुबईत यायचं आहे. बीसीसीआयनं आशियाई क्रिकेट कौन्सिलमधलं आपलं वजन वापरून हे सारं घडवल्याचं सांगण्यात येतं.
.. म्हणून दिनेश कार्तिकचा विजयी षटकार रोहित शर्माने पाहिला नाही!
याच पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश संघ सुपर फोर सामन्यात आमनेसामने येत आहेत. त्यामुळं कदाचित ऑन द फिल्ड आणि ऑफ द फिल्डही भारत-बांगलादेश सामन्याला कटुतेचा रंग चढण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीत टीम इंडियाच्या शिलेदारांना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात थंड डोक्यानं खेळण्याची गरज आहे. एखाद्या वादप्रसंगात बांगलादेशशी भांडून किंवा डोक्यात राख घालून टीम इंडियाला विजय मिळणार नाही. त्यापेक्षा आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणं उत्तम ठरेल.
भारतीय शिलेदारांच्या पाठीशी लागलेलं दुखापतींचं ग्रहण हे टीम इंडियाचं दुर्दैव म्हणायला हवं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाठीत अचानक उसण भरलेल्या हार्दिक पंड्यासह शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेललाही दुखापतीमुळं आशिया चषकातून माघार घ्यावी लागली आहे. शार्दूल ठाकूर जांघेच्या दुखापतीमुळं त्रस्त आहे, तर अक्षर पटेलच्या डाव्या हाताचं बोट दुखावलं आहे. त्या तिघांऐवजी दीपक चहार, रवींद्र जाडेजा आणि सिद्धार्थ कौल ही त्रयी दुबई मुक्कामातल्या भारतीय संघात सामील झाली आहे. आता नव्या जोमानं टीम इंडिया बांगलादेशचा सामना कसा करते ते पाहायचं.
निधास ट्रॉफीत शेवटच्या चेंडूवर षटकार
या वर्षाच्या सुरुवातील श्रीलंकेत झालेल्या निधास ट्रॉफी तिरंगी टी ट्वेण्टी मालिकेत भारत आणि बांगलादेश यांच्यात फायनल रंगली होती. त्यावेळी भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती, तेव्हा दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून, थरारक विजय मिळवला होता. वाचा - विजयी षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे सहा चेंडू
भारत आणि बांगलादेश यांच्यात शेवटचा टी ट्वेण्टी सामना 2016 मध्ये टी ट्वेण्टी विश्वचषकात खेळवण्यात आला. अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात भारताने अवघ्या 1 धावेने निसटता विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने 146 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 145 धावाच करता आल्या होत्या.
संबंधित बातम्या
कार्तिकसारखा फलंदाज आतापर्यंत पाहिला नाही : शाकिब अल हसन
विजयी षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे सहा चेंडू
भारताच्या ऐतिहासिक विजयात दिनेश कार्तिकचा विक्रमी षटकार!
VIDEO : रुबेल हुसेनची धुलाई आणि सुनील गावसकरांचा नागीन डान्स
.. म्हणून दिनेश कार्तिकचा विजयी षटकार रोहित शर्माने पाहिला नाही!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement