एक्स्प्लोर
Advertisement
आयपीएल फायनलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद भिडणार!
आयपीएलच्या विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल पाहायला मिळेल. ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर 13 धावांनी मात केली.
कोलकाता : अफगाणिस्तानच्या रशिद खानने अष्टपैलू कामगिरी बजावून सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या फायनलचं दुसरं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे आयपीएलच्या विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल पाहायला मिळेल.
ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर 13 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने 20 षटकांत 9 बाद 161 धावांची मजल मारली.
रशिद खानने 4 षटकात 19 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. शिवाय सिद्धार्थ कौलने दोन, तर कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या षटकात दोन विकेट घेऊन हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला एक विकेट घेता आली.
रशिद खानची धडाकेबाज फलंदाजी
हैदराबादने 20 षटकात सात बाद 174 धावांची मजल मारली होती. खरं तर हैदराबादला अठरा षटकांत सात बाद 138 धावाच जमवता आल्या. पण तळाला रशिद खानने 10 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 34 धावांची खेळी उभारली. त्यामुळे हैदराबादच्या खात्यात अखेरच्या दोन षटकांत 36 धावांची भर पडली. त्याआधी, रिध्दिमान साहाने 35, शिखर धवनने 34, शकिब अल हसनने 28 आणि दीपक हूडाने 19 धावांची खेळी केली.
हैदराबाद पुन्हा चेन्नईसोबत भिडणार
क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबादवर मात करुन, फायनलचं तिकीट बूक केलं होतं. कोलकात्याचा पराभव करुन हैदराबादने आता फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर 27 मे रोजी खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात चेन्नई आणि हैदराबाद पुन्हा आमनेसामने असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भविष्य
आरोग्य
Advertisement