एक्स्प्लोर
न्यूझीलंडचा 4-0 ने धुव्वा, अझलान हॉकी चषकात भारताला कांस्य
![न्यूझीलंडचा 4-0 ने धुव्वा, अझलान हॉकी चषकात भारताला कांस्य Sultan Azlan Shah Cup 2017 India Defeats New Zealand To Win Bronze न्यूझीलंडचा 4-0 ने धुव्वा, अझलान हॉकी चषकात भारताला कांस्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/07073652/Sultan-Azhlan-Hockey-Cup.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फोटो सौजन्य : हॉकी इंडिया
इपोह, मलेशिया : रुपिंदर पाल सिंगच्या दोन गोल्सच्या जोरावर कर्णधार मनप्रीत सिंगच्या हॉकी संघानं न्यूझीलंडचा 4-0 ने धुव्वा उडवला. शनिवारी मलेशियात झालेल्या 26 व्या सुलतान अझलान शाह हॉकी चषक 2017 मध्ये भारताने कांस्यपदकाची कमाई केली.
शुक्रवारी मलेशियाकडून झालेल्या पराभवामुळे भारताचं फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं होतं. मात्र कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अक्षरशः वर्चस्व गाजवलं.
या सामन्यात रुपिंदरनं 17 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचं खातं उघडलं. रुपिंदरनं 27 व्या मिनिटाला भारताचा सामन्यातला दुसरा गोल झळकावला. त्यानंतर एस व्ही सुनीलनं 48 व्या मिनिटाला गोल झळकावून आपला वाढदिवसच साजरा केला. तर 60 व्या मिनिटाला तलविंदरनं भारताचा सामन्यातला चौथा गोल झळकावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)