एक्स्प्लोर
मैदानात येऊन शतक ठोकणं विराटची सवय : सचिन
शतकांचं शतक ठोकणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराटचं कौतुक केलं आहे.
केपटाऊन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अगदी सवयीनुसार केपटाऊन वन डेतही शतक झळकावलं. त्याचं हे वन डे कारकीर्दीतलं 34 वं शतक ठरलं. विराटच्या या शतकाने भारताला 50 षटकांत सहा बाद 303 धावांची मजल मारून दिली.
शतकांचं शतक ठोकणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराटचं कौतुक केलं आहे. मैदानात उतरणं आणि शतक ठोकणं ही विराटची आता नेहमीची सवयच झाली आहे, असं ट्वीट सचिनने केलं आहे.
सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या, तर सचिन पहिल्या स्थानावर आहे. सचिनच्या नावावर वन डेत 49 शतकं आहेत, तर विराटही वेगाने हा आकड्या गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.Stepping out on the field and scoring centuries has become a regularity for @imVkohli. Congratulations on your 34th ODI ton! Keep the runs flowing always. #INDvsSA pic.twitter.com/4eyuMUpl12
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement