एक्स्प्लोर
वावरिन्का फ्रेन्च ओपनच्या फायनलमध्ये, अँडी मरेला पराभवाचा धक्का
पॅरिस: स्वित्झर्लंडच्या तिसऱ्या मानांकित स्टॅनिस्लास वावरिन्कानं अव्वल मानांकित अँडी मरेचं कडवं आव्हान 6-7, 6-3, 5-7, 7-6, 6-1 असं मोडीत काढून फ्रेन्च ओपनच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली.
फ्रेन्च ओपनच्या गेल्या 44 वर्षांच्या इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारा तो सर्वात वयस्कर टेनिसवीर ठरला आहे. निकी पिलिचनं 1973 साली फ्रेन्च ओपनची फायनल गाठली त्या वेळी तो 33 वर्षांचा होता. वावरिन्कानं वयाच्या 32व्या वर्षी फ्रेन्च ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मान मिळवला आहे.
वावरिन्कानं 2015 साली फ्रेन्च ओपनचं विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम गाजवला होता. आजवरच्या कारकीर्दीत त्यानं ग्रँड स्लॅमची तीन विजेतीपदं पटकावली आहेत. यंदा फ्रेन्च ओपनच्या विजेतेपदासाठी त्याला राफेल नदाल आणि डॉमिनिक थिएम यांच्यापैकी एकाशी लढावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement