एक्स्प्लोर
श्रीलंकेकडून दक्षिण आफ्रिकेला कसोटीत क्लीन स्विप
कोलंबोतील या कसोटीत श्रीलंकेने 199 धावांनी विजय मिळवत नव्या विक्रमाची नोंद केली. 2006 नंतर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच कसोटी मालिका जिंकली आहे.
कोलंबो : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला 2-0 ने मात देत क्लीन स्विप दिली आहे. कोलंबोतील या कसोटीत श्रीलंकेने 199 धावांनी विजय मिळवत नव्या विक्रमाची नोंद केली. 2006 नंतर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलीच कसोटी मालिका जिंकली आहे.
कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात श्रीलंकेने सर्वबाद 338 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने एकट्यानेच श्रीलंकेच्या नऊ फलंदाजांना माघारी धाडत नवा विक्रम केला होता.
पहिल्या डावात खेळण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 124 धावांवर आटोपला. कर्णधार फफ डू प्लेसिसने केलेल्या 48 धावा ही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची सर्वोच्च धावसंख्या होती. श्रीलंकेच्या दिलरुवान परेराने चार, तर अकिला धनंजयने पाच विकेट घेतल्या.
दुसऱ्या डावात श्रीलंकेने दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान उभं केलं. दनुष्का गुणतिलका 61, दिमुथ करुणारत्ने 85 आणि अँजेलो मॅथ्यूज 71 यांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाच बाद 275 धावा केल्या. या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने तीन विकेट घेत सामन्यात एकूण 12 विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला.
अगोदरच पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना दुसऱ्या डावात तग धरता आला नाही. सलामी जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर थेऊनिस डी ब्रुनने एकाकी झुंझ देत नाबाद 101 धावांची खेळी केली. टेंबा बुवामाचा (63) वगळता ब्रुनला कुणीही साथ देऊ शकलं नाही. अखेर दक्षिण आफ्रिकेचा डाव 209 धावांवर आटोपला.
दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या रंगना हेराथने सहा, दिलरुवान परेराने दोन आणि अकिला धनंजयने दोन विकेट घेतल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement