एक्स्प्लोर

IPL 2020: अर्ध्या सिझनपर्यंत नंबर वन असलेल्या दिल्लीवर प्ले ऑफमधून बाहेर होण्याचं संकट!

IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमात चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा रस्ता आता कठिण झाला आहे. अर्ध्या सिझनपर्यंत टॉपवर असलेल्या दिल्लीला सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं आता त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमात चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा रस्ता आता कठिण झाला आहे. अर्ध्या सिझनपर्यंत टॉपवर असलेल्या दिल्लीला सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं आता त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर दुसरीकडे सनराइजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला 88 धावांनी पराभूत करत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. दिल्लीला प्ले ऑफ क्वालीफाय करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. मात्र उर्वरित दोन सामन्यात दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्स आणि बेंगलोरशी होणार आहे. त्यामुळं दिल्लीचा रस्ता कठिण मानला जात आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळं आज प्ले ऑफमध्ये जाणाऱ्या पहिल्या संघावर शिक्कामोर्तब होणार आहे. आयपीएलच्या 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी विजय मिळवला. रिद्धीमान साहा, रशीद खान आणि डेविड वॉर्नर हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. हैदराबादने धावांचा डोंगर उभारत दिल्ली समोर 220 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने संघ अवघ्या 131 धावांवर गारद झाला. या विजयासह हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये सहाव्या नंबर पोहोचली आहे. रशीद खानच्या फिरकीसमोर दिल्लीचे खेळाडू टिकू शकले नाहीत. रशीद खानने 4 षटकांत 7 धावा देत 3 विकेट घेतल्या. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 26, शिमरॉन हेटमायरने 16, तुषार देशपांडेने 20 धावा केल्या. दिल्लीचे इतर खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. हैदराबादकडून रशीद खानने 3, संदीप शर्मा आणि नजराजनने 2 तर शाहबाज नदीम, जेसन होल्डर आणि विजय शंकरने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी टॉस जिंकून प्रथन फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात दमदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि रिद्धिमान साहाने पहिल्या विकेटसाठी 9.4 षटकांत 107 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने 34 चेंडूत 66 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर साहाने मनीष पांडेसमवेत दुसर्‍या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. साहाने 45 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत साहाने 12 चौकार आणि 2 षटकार लगावले. 170 धावांत दोन विकेट गेल्यानंतर मनीष पांडे आणि केन विल्यमसन यांनी 49 धावांची नाबाद भागीदारी केली. पांडेने 31 चेंडूंत नाबाद 44 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीमधून चार चौकार आणि एक षटकार लगावला. विल्यमसन 10 चेंडूत 11 धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून आर अश्विन आणि एनरिक नॉर्टजे प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-5 Live : पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget