India Vs South Africa : बाॅक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत; टीम इंडियाला पराभव टाळण्यासाठी संघर्ष करावा लागणार
India Vs South Africa : भारताकडून म्हणावी तशी गोलंदाजी प्रभावी ठरवू शकली नाही. भारताकडून बुमराहने तीन विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या.
India Vs South Africa : टीम इंडियाला अवघ्या 245 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बॉक्सिंग डे कसोटीत आपलं स्थान भक्कम केलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी करताना आपला डाव 400 च्या घरात नेला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 150 हुन अधिक धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे कसोटी वाचवण्यासाठी टीम इंडियाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
TAKE A BOW, DEAN ELGAR...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2023
185 (287) with 28 fours - a great marathon show by Elgar in his farewell series. A superb innings against India at his home ground. pic.twitter.com/GE91JMhb9T
क्रिकेट कारकिर्दीमधील शेवटची कसोटी खेळत असलेल्या आपल्या घरच्या मैदानावर तडाखेबाज खेळी करताना डीन एल्गरने 185 धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार आला. मधल्या फळीतील डेव्हिड बेडिंगहम आणि मार्को जानसेनने अर्धशतकी खेळी करत भक्कम साथ दिली. बेडिंगहम 56 धावा करून बाद झाला. जानसेन अजूनही मैदानात आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 400 च्या घरात गेला आहे.
End of an iconic innings of Dean Elgar....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) December 28, 2023
185 runs from 287 balls in tough conditions at Centurion, he is making his farewell series a special one - this innings will be remembered forever. 👌 pic.twitter.com/0pAGllQaRx
भारताकडून म्हणावी तशी गोलंदाजी प्रभावी ठरवू शकली नाही. भारताकडून बुमराहने तीन विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. आता ही कसोटी वाचवण्यासाठी इंडियाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कसोटीचे अजून दोन दिवस बाकी असल्याने आज तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकरात लवकर गुंडाळून आघाडी कमी करून पुन्हा दक्षिण आफ्रिकेला आव्हान देण्यासाठी टीम इंडियाच्या फलंदाजांवरती जबाबदारी असेल. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहेत.
South Africa 392/7 on Day 3 Lunch.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2023
Another session went in favour of Proteas - the lead is now 147 runs. Game drifting away from India. pic.twitter.com/sZ8sxgCI9l
इतर महत्वाच्या बातम्या