एक्स्प्लोर
सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञाताकडून धमकीचं पत्र मिळाल्याचं गांगुलीने सांगितलं.
सौरव गांगुली 19 जानेवारीला पश्चिम बंगालच्या मिदीनीपूर जिल्ह्यातील विद्यासागर विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमापासून दूर राहा, अशी धमकी गांगुलीला पत्राद्वारे देण्यात आली आहे.
7 जानेवारीला मला धमकीचं पत्र मिळालं होतं. मी याबाबत पोलिसांना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना माहिती दिली आहे, असं बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं.
या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही. हा एक लाईव्ह कार्यक्रम असेल. जर मी तिथे गेलो तर तुम्हाला समजेलच, असंही सौरव गांगुली म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement