एक्स्प्लोर
Advertisement
सौरव गांगुलीकडून टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होण्याचे संकेत
भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश होतो. हा यशस्वी कर्णधार भविष्यात टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश होतो. हा यशस्वी कर्णधार भविष्यात टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी निवेदन अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. सौरव गांगुलीने यावेळी अर्ज भरला नव्हता, परंतु टीम इंडियाच्या विद्यमान प्रशिक्षकांचा (चारही प्रक्षिक्षक) कालावधी संपल्यानंतर सौरव गांगुली प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करु शकतो, असे म्हटले जात आहे.
टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याबाबत सौरव गांगुलीला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना दादा म्हणाला की, भविष्यात मी या प्रश्नाचे उत्तर देईन. गेल्या वर्षीपासून मी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाचा सल्लागार म्हणून कामाला सुरुवात केली आहे. त्याच वर्षी दिल्लीचा संघ तब्बल सात वर्षांनंतर प्ले ऑफपर्यंत मजल मारु शकला. ही माझी चांगली सुरुवात आहे. सौरव गांगुलीच्या याच विधानाचा त्याच्या भविष्यातील टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याशी संबंध जोडला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
बुलढाणा
मुंबई
Advertisement