एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीसीसीआयच्या मीडिया हक्कांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणं
सोनी पिक्चर्स, स्टार इंडिया आणि रिलायन्स या तीन समूहांमध्ये पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया हक्क मिळवण्यासाठी चुरस सुरु आहे.
मुंबई : बीसीसीआयच्या मायदेशातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठीच्या ई-लिलाव प्रक्रियेत आजही कोटीच्या कोटी उड्डाणं पाहायला मिळत आहेत. सोनी पिक्चर्स, स्टार इंडिया आणि रिलायन्स या तीन समूहांमध्ये पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया हक्क मिळवण्यासाठी चुरस सुरु आहे.
बीसीसीआयच्या ई-लिलाव प्रक्रियेत दुपारी 5.30 वाजता आलेली बोली 6 हजार 32 कोटी रुपयांची होती. काल सायंकाळी आलेली अखेरची बोली 4 हजार 442 कोटी रुपयांची होती.
कोटीच्या कोटी उड्डाणं आजही सुरुच आहेत. आज सकाळी 11 वाजता ई-लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरु झाली असून, दुपारी 5.30 वाजेपर्यंत मीडिया हक्कांची बोली एक हजार 1600 कोटींनी वाढली आहे.
दुसऱ्या दिवसाच्या बोलीनंतर प्रति सामना रक्कम ही 60 कोटींच्या घरात गेली आहे. येत्या पाच वर्षांत तिन्ही फॉरमॅट्सचे मिळून 102 आंतरराष्ट्रीय सामने भारतात होतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement