एक्स्प्लोर

मुरली विजय श्रीलंका दौऱ्यातून आऊट, शिखर धवनला संधी

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागेवर शिखर धवनला संधी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागेवर शिखर धवनला संधी देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली. श्रीलंका दौऱ्यासाठी मुरली विजयचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मुरली विजयला दुखापत झाली होती, ज्यातून तो अजूनही सावरलेला नाही. मुरली विजयला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना उजव्या मनगटाला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या मेडीकल टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्याच्या जागी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा श्रीलंका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याचीही माहिती आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या काळात खेळवला जाणार आहे. वन डे मालिकेची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी दंबुलाच्या मैदानातून होणार आहे. दुसरा आणि तिसरा वन डे अनुक्रमे 24 आणि 27 ऑगस्टला खेळवला जाईल. तर चौथा आणि पाचवा वन डे खेट्टाराम इथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर एकमेव टी-20 सामनाही खेळवला जाईल. श्रीलंकेचा संघ यापूर्वी 2015 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. टीम इंडिया जवळपास एका वर्षानंतर परदेशात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने परदेशात अखेरचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. टीम इंडिया या दौऱ्यावर नवे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : अंडर 19 आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारतानं अफगाणिस्तानला लोळवलं,  फायनलमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी 
अफगाणिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्याची टीम इंडियाकडे संधी
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Anirudh Ravichander and Kavya Maran: चर्चांना पूर्णविराम! काव्या-अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले; लग्नातील पहिला PHOTO समोर, दोघांचा लूक पाहिलात का?
चर्चांना पूर्णविराम! काव्या-अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले; लग्नातील पहिला PHOTO समोर, दोघांचा लूक पाहिलात का?

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget