एक्स्प्लोर
शशांक मनोहर आयसीसी अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाल पूर्ण करणार
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसीचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कार्यकालाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. शशांक मनोहर हे आयसीसी अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकालही पूर्ण करणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.
शशांक मनोहर यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल हा जून 2018 मध्ये संपत आहे. मनोहर यांनी मार्च महिन्यात वैयक्तिक कारणास्तव आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
पण आयसीसीच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी गळ घातल्यामुळे त्यांनी आयसीसी बोर्डाच्या 24 एप्रिलच्या बैठकीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचं मान्य केलं होतं.
याच बैठकीदरम्यान आयसीसीला संलग्न 105 देशांच्या प्रतिनिधींपैकी बहुसंख्य प्रतिनिधींना मनोहर यांचं मन वळवण्यात आणखी यश आलं. त्यामुळे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाल पूर्ण करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
संबंधित बातम्या :
शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन!
शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement