एक्स्प्लोर
अझरुद्दीनच्या मुलामुळे गोव्यातील क्रिकेटपटूंचं स्वप्न भंगलं : जकाती
रणजी स्पर्धेत गोव्यासाठी भरीव कामगिरी करुनही संभाव्य खेळाडूंच्या यादीतून वगळल्याने जकातीने नाराजी व्यक्त केली आहे.
पणजी : "टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या मुलामुळे गोव्यातील दोन क्रिकेटपटूंचं रणजी खेळण्याचं स्वप्न भंगलं," असा आरोप रणजीपटू शादाब जकातीने गोवा क्रिकेट असोसिएशनवर केला आहे. रणजी स्पर्धेत गोव्यासाठी भरीव कामगिरी करुनही संभाव्य खेळाडूंच्या यादीतून वगळल्याने जकातीने नाराजी व्यक्त केली आहे.
"मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असदुद्दीन मोहम्मद आणि अमित वर्मा यांची गोव्याच्या रणजी संघात वर्णी लावून, गोवा क्रिकेट असोसिएशनने गोव्यातील दोन क्रिकेटपटूंचे रणजी खेळण्याचं स्वप्न भंगलं," असा आरोप शादाबने काल (24 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन केला.
शादाबने गोव्यातर्फे 20 वर्षे रणजी खेळून 92 सामन्यांमधून 272 बळी घेतले आहेत. नऊ वर्ष शादाबने आयपीएलमध्ये देखील प्रभावी कामगिरी केली आहे. आपली कामगिरी समाधानकारक असूनही जीसीएने रणजी संघातून वगळून आपल्यावर अन्याय केला. याबाबत आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शादाबने दिला. शादाबने जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर आणि संघाचे प्रशिक्षक प्रकाश मयेकर यांच्या कार्यक्षमतेवर देखील जोरदार टीका केली.
दरम्यान जीसीएचे सचिव दया पागी यांनी शदाबचे आरोप फेटाळून लावत शदाबची कामगिरी समाधानकारक नसल्यानेच त्याला वगळल्याचं स्पष्ट केलं आहे. पागी यांनी असदुद्दीन आणि अमित यांच्या निवडीचे समर्थन केले आहे. "दोघे प्रोफेशनल क्रिकेटपटू असून गोव्याचे पाहुणे असल्याचे पागी यांचं म्हणणं आहे. असदुद्दीनचे वडील आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे गोव्याच्या संघासाठी कोणताही मोबदला न घेता मेंटर म्हणून काम करणार आहे. त्यामुळे गोव्याच्या क्रिकेटपटूंना त्यांचं मार्गदर्शन मोलाचे ठरेल," असा दावा पागी यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement