एक्स्प्लोर
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...
मुंबई : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे. सैन्याच्या कारवाईवर देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वच राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूंनी सैन्य आणि पंतप्रधानांचं कौतुक करत आभार मानले आहेत. या कारवाईनंतर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारु नये, असं ट्वीट शाहिद आफ्रिदीने केलं आहे.
फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ
तो लिहितो की, "पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. ज्या गोष्टी चर्चेमुळे सुटू शकतात, त्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलण्याची गरज काय? पाकिस्तानला सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. जेव्हा दोन शेजारी देश भांडतात, तेव्हा दोन्ही देशांचं नुकसान होतं. से नो टू वॉर" https://twitter.com/SAfridiOfficial/status/781555557945704448 https://twitter.com/SAfridiOfficial/status/781555650270732288 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळं उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!
आफ्रिदी केवळ क्रिकेटर नाही तर समाजसेवकही आहे. तो सध्या चॅरिटीचं काम करतो. शिवाय मार्च 2014 मध्ये त्याने 'शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. गरीब आणि वंचितांचं आयुष्य सुधारण्यासाठी ही संस्था काम करते. मला आणि संघाला पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळाल, असं वक्तव्य केल्यानंतर मागील वर्षी त्याला रोषाला सामोरं जावं लागलं होतं. संबंधित बातम्यासर्जिकल स्ट्राईकनंतर आज पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक
सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली
भारत-पाकिस्तान सीमा कुठून कुठपर्यंत?
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द
पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं
मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे
सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?
भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना
भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement