एक्स्प्लोर
Advertisement
BCCI मध्ये आणखी एक मराठी चेहरा, संतोष रांगणेकर पहिले CFO
मुंबई : मुंबईच्या संतोष रांगणेकर यांची बीसीसीआयचे पहिले चीफ फायनान्शियल ऑफिसर अर्थात सीएफओ म्हणून नियुक्ती झाली आहे. लोढा समितीच्या शिफारशींनुसार हे पद तयार करण्यात आलं आहे.
रांगणेकर यांच्या नियुक्तीमुळं बीसीसीआयच्या प्रशासनात आणखी एक मराठी चेहरा मोठ्या पदावर काम करताना दिसेल. रांगणेकर यांनी नुकताच टाटा सन्स सर्व्हिसेस लिमिटेडमधून उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
रांगणेकर यांनी सीए तसंच लॉचं शिक्षण घेतलं असून, एक कॉर्पोरेट फायनान्स प्रोफेशनल आणि टॅक्सेशनमधले तज्ञ म्हणून त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. रांगणेकर हे मुंबईच्या माहिमचे रहिवासी असून येत्या 15 जूनपासून बीसीसीआयच्या सीएफओपदाचा कारभार स्वीकारतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement