(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanju Samson : धोनीला बाजूला करून चेन्नईचा कॅप्टन होण्यासाठी संजू सॅमसनशी बोलणी सुरु होती? आश्विनचे फक्त सहा शब्दात उत्तर!
Sanju Samson : सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी असा दावा केला आहे की, आर. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हे सांगितले आहे. पण आश्विनने खरंच हे सांगितलं का? अशीही चर्चा रंगली.
R Ashwin On Sanju Samson : राजस्थान राॅयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन आयपीएलमधील यशस्वी टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा भाग होणार होता का? अशी चर्चा सोशल मीडियात जोरदार रंगली आहे. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन असलेल्या संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्जचा भाग होण्यास नकार दिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. चेन्नईला संजू सॅमसनला त्यांच्या संघाचा कर्णधार करायचे होते, असेही म्हटले जात होते, करार जवळजवळ निश्चित झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी गोष्टी घडल्या नाहीत, असा दावाही करण्यात आला होता.
सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी असा दावा केला आहे की, आर. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हे सांगितले आहे. पण आश्विनने खरंच हे सांगितलं का? अशीही चर्चा रंगली.
चेन्नई सुपर किंग्जने खरोखरच संजू सॅमसनशी संपर्क साधला होता का?
मात्र, यावर आता थेट आश्विनचे उत्तर आले आहे. आश्विनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, चेन्नई सुपर किंग्जने संजू सॅमसनशी संपर्क साधला, परंतु करार निश्चित झाला नाही. अशा फेक न्यूजची बरीच चर्चा झाली. आर. आश्विन म्हणाला की, अशा बातम्यांना कोणताही आधार नाही, ही पूर्णपणे फेक न्यूज आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या नावाशी फेक न्यूज जोडून पसरवू नये.
Ashwin on his YouTube channel - "Sanju Samson was approached by CSK as a captain which was nearly finalised. But it dint go through Sanju rejected their offer. Theres a definite possibility in future". #SanjuSamson #IPL2024 #iplauction2024 pic.twitter.com/DnKZ1g0nu8
— Roshmi 🏏 (@CricketWithRosh) November 28, 2023
संजू सॅमसन गेली 10 वर्षे राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय
संजू सॅमसन आयपीएल 2013 पासून राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. तथापि, यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सचा देखील भाग बनला, परंतु नंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या पुनरागमनानंतर त्याच्या जुन्या संघात परतला. अलीकडेच, सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की चेन्नई सुपर किंग्ज संजू सॅमसनला त्यांच्या संघाचा कर्णधार बनवू इच्छित आहे, करार जवळजवळ निश्चित झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी विकेटकीपर फलंदाजाने नकार दिला. असे आश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र आता रवी अश्विनने ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचं तो म्हणाला.
इतर महत्वाच्या बातम्या