मुख्यपृष्ठक्रीडाटीम इंडियाच्या पराभवावर काय म्हणाली सानिया मिर्झा?
टीम इंडियाच्या पराभवावर काय म्हणाली सानिया मिर्झा?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 19 Jun 2017 08:05 AM (IST)
1/6
क्रिकेटमधील पाकिस्तानचा विजय आणि हॉकीमधील भारताचा विजय यावर टेनिसस्टार सानिया मिर्झानं ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त केलं. 'क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला पण हॉकीमध्ये आम्ही त्यांच्याविरोधात विजय मिळवला आहे. त्यासाठी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन.'
2/6
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी भारतीय हॉकी संघानं मात्र पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या हॉकी संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला.
3/6
339 धावांचा पाठलाग करताना भारताचे महारथी फलंदाज अतिशय स्वस्तात माघारी पतरले, रोहित , विराट, धवन, धोनी, युवी, हे सर्व फलंदाज एकामागे एक तंबूत परतले,. हार्दिक पंड्यानं धडाकेबाज फलंदाजी करत सामन्यामध्ये थोडी जान आणली.. मात्र तो देखील रन आऊट झाला.. अखेर पाकिस्ताननं 158 धावांमध्ये भारतीय संघाला गुंडाळून चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवला.
4/6
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानकडून दारुण पराभवाला सामोर जावं लागलं. प्रथम फलंदाजी करताना भारतील गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत पाकिस्ताननं 338 धावा ठोकल्या.
5/6
या सामन्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
6/6
यासोबतच तिनं पाकिस्तानी संघाचंही कौतुक केलं. 'खेळ सर्वांना समान पातळीवर आणून ठेवतो.' असंही यावेळी ती म्हणाली.