एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चायना ओपन : सायनाचा पराभव, सिंधूची विजयी सलमी
बीजिंग : रिओ ऑलिम्पिकमधल्या भारताच्या रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूने चायना ओपन सुपर सीरीजमध्ये विजयी सलामी दिली आहे. सातव्या मानांकित सिंधूने चीन तैपेईच्या शिआ सिन लीचा 21-12, 21-16 असा अवघ्या 34 मिनिटांमध्ये फडशा पडला.
या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सिंधूचा मुकाबला अमेरिकेच्या बीवेन झॅन्गशी होईल. पुरुष एकेरीत भारताच्या अजय जयरामने चीनच्या झू सियुआनचा 21-19, 20-22, 21-17 असा पराभव केला. भारताच्या एच. एस. प्रणॉयने हाँगकाँगच्या लॉन्ग अॅन्गसचा 21-13, 21-13 असा धुव्वा उडवला.
सायनाचा पुनरागमनाचा पहिला प्रयत्न अयशस्वी
भारताची फुलराणी सायना नेहवालचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमनाचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. तिला चायना ओपन सुपर सीरीजच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं.
थायलंडच्या पर्णतिपने सायनाचं आव्हान 21-16, 19-21, 21-14 असं तासाभरातच मोडून काढलं. रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरीत सायना दुसऱ्याच फेरीत पराभूत झाली होती. त्यानंतर गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे तिला तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.
विश्रांतीनंतर चायना ओपनमध्ये खेळून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करण्याचा सायनाचा प्रयत्न होता. पण पहिल्याच फेरीत झालेल्या पराभवामुळे सायनाला आता हाँगकाँग सुपर सीरीजची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सदर स्पर्धेला पुढील आठवड्यात सुरुवात होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement