एक्स्प्लोर
सचिनचं चाहत्याच्या पत्राला हटके उत्तर, सोशल मीडियात पत्र व्हायरल
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तरी अजूनही त्याची लोकप्रियता कायम आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी तर त्याला आजही क्रिकेटचा देव मानतात. सचिनच्या अशाच एका चाहत्याने नुकतेच त्याला पत्र लिहलं होतं. त्याला सचिननंही हटके उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे, आपल्या चाहत्याचं हे पत्र सचिननं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
सचिनच्या या चाहत्याचं नाव करण गांधी असं असून, सध्या तो अमेरिकेत वास्तव्याला आहे. वरुणने आपल्या पत्रात सचिनला उद्देशून म्हणलंय की, ''मी तुमचा खेळ पाहूनच लहानाचा मोठा झालो. तुमचा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी मी माझा अभ्यास वर्गही सोडला होता.''
सचिननं आपल्या करणला तत्काळ उत्तर दिलं आहे. सचिननं इंस्टाग्रामवर करणचं हे पत्र पोस्ट करुन म्हणलं आहे की, ''माझा सामना पाहण्यासाठी तू आपला क्लास सोडलास. पण यामुळे तुझ्या शिक्षकांना हे नक्कीच आवडलं नसेल.'' सचिनचं हे पत्र सध्या सोशल मीडियात कमालीचं व्हायरल होत असून, याला लाखो लाईक्स मिळत आहेत. सचिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी अनेकदा संवाद साधला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement