एक्स्प्लोर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक सन्मान, आयसीसीच्या ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
सचिनच्या अगोदर माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे यांचा आयसीसीने क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला होता.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आणखी एका सन्मानाने गौरवलं आहे. आयसीसीने सचिन तेंडुलकरचा समावेश ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये केला आहे.
यंदा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम 2019 मध्ये भारताचा सचिन तेंडुलकर, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरिन या तीघांचा यात समावेश करण्यात आला. गुरुवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांनी या नावांची घोषणा केली.
आमच्यासाठी हा मोठा सन्मान असून आयसीसीच्या वतीने, या क्लबच्या महान सदस्यांच्या सर्वकालीन यादीत या सदस्यांचा समावेश झाल्याबद्दल मी या तीन खेळाडूंचं अभिनंदन करतो, असं मतं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांनी व्यक्त केलं आहे. सचिनच्या अगोदर माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे यांचा आयसीसीने क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला होता. Sachin Tendulkar | 10 वर्ष प्रतिसाद नाही, सचिन तेंडुलकरचा नागरी सन्मान बीएमसीकडून रद्द | मुंबई | ABP Majha क्रिकेट हॉल ऑफ फेम म्हणजे काय? आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम म्हणजे क्रिकेट इतिहासाच्या महान क्रिकेटपटूंच्या यशाची ओळख करुन त्यांना सन्मानित करण्याचं उद्देशाने तयार केलेला एक गट आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयसीसीने क्रिकेट हॉल ऑफ फेम सुरु केला. सुरवातीला यात 55 खेळाडूंचा समावेश होता. आयसीसीच्या या पुरस्कारांच्या दरम्यान दर वर्षी नवीन सदस्यांचा समावेश केला जातो. आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमच्या सुरुवातीच्या यादीमध्ये डब्ल्यू जी ग्रेस, ग्रॅहम गूच, बॅरी रिचर्ड्स यांचा समावेश आहे. VIDEO | सचिन ज्या मैदानात क्रिकेट शिकला, त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचं नाव | मुंबई | एबीपी माझा"It's a huge honour for me." Watch Sachin Tendulkar talk live about his induction into the ICC Hall of Fame ⬇️ https://t.co/52tLO0bNZE pic.twitter.com/EB0iy1bP6m
— ICC (@ICC) July 18, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement