एक्स्प्लोर
युवराजचे 300 वन डे पूर्ण, सचिनचा भावूक मेसेज

मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराजने सिंहने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच नवा विक्रम रचला. युवराज 300 पेक्षा जास्त वन डे सामने खेळणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला आहे.
कॅन्सरसारख्या आजाराला तोंड देत पुन्हा त्याच हिंमतीने आणि नव्या क्षमतेने मैदानात उतरणाऱ्या युवराजचं क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने भरभरुन कौतुक केलं आहे. युवराजच्या करिअरमधील चढउतार पाहता सचिनने भावूक मेसेज लिहिला आहे.
सचिन म्हणतो...
‘’युवराजचं व्यक्तिमत्व एकाच शब्दात सांगायचं झालं तर,
त्याचा समाधानपणा ,जो इतर कुणाकडेही नाही.
विविध संकटांना तोंड देत त्याने संघात ज्या प्रकारे पुनरागमन केलं,
ते कल्पनात्मक आहे.
तरीही त्याच्या कारकिर्दीतील 300 वा सामना पूर्ण झाल्यानंतर मी भावूक झालो आहे.
युवीचा प्रवास चढ-उतांराचा आहे.
पण कधीही मत व्यक्त करु नका आणि पूर्ण समतोल राखा या त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे.
तो भारतासाठी आणि प्रतिस्पर्धींकडून विजय हिसकावून घेण्यासाठी आणखी त्याच्या क्षमतेने आणखी चांगली कामगिरी करेल,
अशी मला खात्री आहे.’’
युवराजने 300 सामन्यांमध्ये 36.84 च्या सरासरीने 8 हजार 622 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यानंतर 300 सामने खेळणारा युवराज पाचवा खेळाडू ठरला आहे. 2011 च्या विश्वचषकात युवराजला कॅन्सरचा आजार असूनही तो टीम इंडियासाठी खेळतच राहिला. संपूर्ण विश्वचषकात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत त्याने टीम इंडियाला विश्वषकाचा किताब मिळवून दिला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जालना
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
