Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू
Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.
Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा Chennai Super Kings (CSK) स्टार प्लेअर मराठमोळा ऋतुराज गायकवाड आज लग्नबंधनात अडकला. ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा महाबळेश्वरमध्ये विवाहसोहळा (Ruturaj Gaikwad Wedding) आज पार पडला आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत आणि चाहत्यांनी त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या विजयानंतर मैदानावर ऋतुराज उत्कर्षा पवारसोबत फिरताना दिसला होता. मध्यंतरी त्या दोघांचा महेंद्रसिंग धोनी सोबतचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता. या दरम्यान त्याने लग्नाची घोषणा केली होती. ऋतुराजची बायको उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) ही देखील एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा पवारचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी झाल असून ती 24 वर्षांची आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज यांची जुनी मैत्री आहे आणि आता या मैत्रीचे रूपांतर जोडीदाराच्या (Ruturaj Gaikwad’s Wife) रुपात झाले आहे.
नुकतंच ऋतुराज आणि उत्कर्षाचा मेहेंदी सोहळा (Mehendi Ceremony) देखील पार पडला. त्यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. ऋतुराजने हातावर उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढली होती. ऋतुराज व उत्कर्ष दोघेही क्रिकेट (Cricket) खेळत असल्याने त्यांची मेहेंदी देखील क्रिकेट थीमची होती. ऋतुराजने त्याच्या एका हातावर लग्नाची तारीख काढली आहे. तर दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट आणि बॉलचं डिझाइन काढलं आहे. ऋतुराजच्या या मेहेंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.