Rohit Sharma : टीम इंडिया 12 वर्षांनी फायनल फोहोचली, पण त्यावेळी संघात नसूनही हिटमॅन रोहितनं बोललेला शब्द खरा करून दाखवला!
Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. भारताच्या विजयाच्या जल्लोषात, रोहित शर्माची 12 वर्ष जुनी ट्विटर पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Rohit Sharma : उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाचा पराभव करत आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने 70 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, परंतु त्यांचा संघ केवळ 327 धावांवरच ऑलआऊट झाला. मोहम्मद शमीने एकट्याने 7 विकेट घेतल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांमुळे भारताला उपांत्य फेरीचा मार्ग पार करता आला.
Nasser Hussain talking about the importance of Rohit Sharma.
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
- Captain, Leader, Legend 🇮🇳pic.twitter.com/2L7dmlYFSf
विश्वचषक संघाचा भाग न मिळाल्याने खरोखर निराश झालो
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारताच्या विजयाच्या जल्लोषात, रोहित शर्माची 12 वर्ष जुनी ट्विटर पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये भारताच्या विश्वचषक टीमचा भाग नसल्याने त्याने ट्विट करून निराशा व्यक्त केली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'विश्वचषक संघाचा भाग न मिळाल्याने खरोखर निराश झालो. मला येथून पुढे जाण्याची गरज आहे.. पण प्रामाणिकपणे, कोणतीही मते हा एक मोठा धक्का होता.
Really really disappointed of not being the part of the WC squad..I need to move on frm here..but honestly it was a big setback..any views!
— Rohit Sharma (@ImRo45) January 31, 2011
न्यूझीलंडवर भारताच्या विजयानंतर ही पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक रोहित शर्माच्या संयम आणि दृढनिश्चयाबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. आता खूप पुढे गेल्याचा आनंदही लोकांनी व्यक्त केला. एका यूजरने म्हटले की, 'पहिली निराशा आणि आता सर्वात मोठ्या विजयाकडे वाटचाल.' आणखी एका यूजरने लिहिले, 'विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल.'
Rohit Sharma has scored 416 runs through boundaries from 550 runs he has scored in World Cup 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) November 16, 2023
- The Hitman 2.0 is danger. 🫡 pic.twitter.com/RojoUhuTKH
अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे.
Mathew Hayden said "Rohit Sharma is almost my player of the tournament, the impact he had is huge". [Star Sports] pic.twitter.com/m31NXDAzZ6
— Johns. (@CricCrazyJohns) November 16, 2023
इतर महत्वाच्या बातम्या