एक्स्प्लोर

हैदराबादच्या रणांगणात 'महाराष्ट्र डर्बी'

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमाचा रथ मजल दरमजल करत आता हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दाखल झाला आहे. हैदराबादच्या याच रणांगणात रविवारी होणार आहे आयपीएलच्या महायुद्धातली आखरी जंग. आणि हीच लढाई आयपीएलच्या विजेतेपदाचा नवा मानकरी ठरवणार आहे. आयपीएल विजेतेपदाच्या या लढाईत एका बाजूला आयपीएलची सुपरजायंट फौज रायझिंग पुणे आहे, तर दुसऱ्या बाजूला उभी ठाकलीय यंदाची सुपर परफॉर्मर टीम मुंबई इंडियन्स. आयपीएलच्या इतिहासात पुण्याचा हा केवळ दुसराच मोसम आहे, पण दुसऱ्याच मोसमात पुण्यानं फायनलमध्ये धडक मारून आपण आयपीएलचा रायझिंग सुपरजायंट असल्याचं दाखवून दिलं. मुंबईची आयपीएलची फायनल गाठण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईनं याआधी 2010, 2013 आणि 2015 साली आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवलं होतं. तसंच 2013 आणि 2015 साली मुंबईनं आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नावही कोरलं आहे. मुंबईनं यंदाच्या मोसमात सोळापैकी अकरा सामने जिंकून, सर्वाधिक विजय साजरे करण्याचा पराक्रम गाजवला आहे. पण पुणेही मुंबईपेक्षा फार पिछाडीवर नाही. पुण्याच्या खात्यात पंधरापैकी दहा सामन्यांमध्ये विजय आहे. त्याच पुण्यानं साखळीतल्या दोन आणि प्ले ऑफच्या क्वालिफायर सामन्यात मिळून मुंबईला तीनपैकी तिन्ही सामन्यांमध्ये हरवण्याची कामगिरी बजावली आहे. आता विजेतेपदाची लढाई जिंकून, पुण्याकडून झालेल्या त्या तिन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी मुंबई साधणार का, याचीच उत्सुकता आयपीएलच्या चाहत्यांना लागून राहिलीय. आयपीएलच्या या फायनलच्या निमित्तानं घेऊयात मुंबई आणि पुणे या दोन्ही फौजांच्या ताकदीचा आढावा. यंदाच्या आयपीएल मोसमात फलंदाजी हे मुंबईचं बलस्थान ठरलंय. नितीश राणासारखा 13 सामन्यांमध्ये 333 धावांचा रतीब घालणारा, तसंच अधूनमधून मॅचविनिंग खेळी करणारा फलंदाज सध्या डगआऊटमध्ये बसतो यातून मुंबईच्या फलंदाजीची ताकद दिसून येते. पण मुंबईची ही फलंदाजी कधी कधी बेभरवशाचीही ठरू शकते याची प्रचीती क्वालिफायर वन सामन्यात आली. वानखेडेवरच्या त्या सामन्यात मुंबईला 163 धावांच्या लक्ष्याचाही पाठलाग करता आला नव्हता. त्यामुळं आयपीएलच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरायचं तर मुंबईच्या पार्थिव पटेल (15 सामन्यांमध्ये 391 धावा), कायरन पोलार्ड (16 सामन्यांमध्ये 378 धावा), रोहित शर्मा (16 सामन्यांमध्ये 309 धावा) आणि लेण्डल सिमन्स (सहा सामन्यांमध्ये 134 धावा) या चार फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावावी लागेल. तळाला हार्दिक (16 सामन्यांमध्ये 240 धावा) आणि कृणाल पंड्या (12 सामन्यांमध्ये 196 धावा) यांचा सातत्यपूर्ण वाटाही मुंबईच्या दृष्टीनं मोलाचा ठरावा. पुण्याच्या दृष्टीनं कर्णधार स्टीव्ह स्मिथ (14 सामन्यांमध्ये 421 धावा), राहुल त्रिपाठी (13 सामन्यांमध्ये 388 धावा), अजिंक्य रहाणे (15 सामन्यांमध्ये 338 धावा), मनोज तिवारी (14 सामन्यांमध्ये 317 धावा) आणि महेंद्रसिंग धोनी (15 सामन्यांमध्ये 280 धावा) यांचा फॉर्म फलंदाजीत जमेची बाजू ठरावा. पण अष्टपैलू बेन स्टोक्स (12 सामन्यांमध्ये 316 धावा आणि 12 विकेट्स) आणि लेग स्पिनर इम्रान ताहिर (12 सामन्यांमध्ये 18 विकेट्स) माघारी परतल्यानं पुण्याच्या फौजेतला समतोलपणा मात्र कमी झाला आहे. अर्थात वॉशिंग्टन सुंदर (10 सामन्यांमध्ये आठ विकेट्स) आणि शार्दूल ठाकूरनं (11 सामन्यांमध्ये 11 विकेट्स) क्वालिफायर वन सामन्यात मुंबईला नऊ बाद 142 धावांत रोखून पुण्याला स्टोक्स आणि ताहिरची उणीव भासू दिली नाही. पण फायनलमध्ये मुंबईला पुन्हा रोखायचं, तर जयदेव उनाडकट (11 सामन्यांमध्ये 22 विकेट्स),  डॅनियल ख्रिस्तियन (12 सामन्यांमध्ये नऊ विकेट्स) आणि अॅडम झाम्पा (पाच सामन्यांमध्ये पाच विकेट्स) याच्यासह सुंदर आणि शार्दूललाही कंबर कसावी लागेल. दरम्यान, क्वालिफायर टू सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याला अवघ्या 107 धावांत रोखल्यानं कर्णधार रोहित शर्माचा आत्मविश्वास दुणावला आहे. मिचेल जॉन्सन (चार सामन्यांमध्ये चार विकेट्स) आणि लसिथ मलिंगा (11 सामन्यांमध्ये 11 विकेट्स) यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्टार हाताशी असणं हे रोहितचं भाग्य आहेच, पण जसप्रीत बुमरा (15 सामन्यांमध्ये 18 विकेट्स) आणि हार्दिक पंड्या (16 सामन्यांमध्ये सहा विकेट्स) हाणामारीच्या षटकांत कमालीचा टिच्चून मारा करत आहेत. हरभजनसिंगसारख्या अनुभवी शिलेदाराला विश्रांती देऊनही, कर्ण शर्मा (आठ सामन्यांमध्ये 13 विकेट्स) आणि कृणाल पंड्यानं (12 सामन्यांमध्ये 10 विकेट्स) मुंबईच्या फिरकीची धार कमी होऊ दिलेली नाही. हाच कर्ण शर्मा क्वालिफायर टू सामन्यात मुंबईच्या विजयाचा एक शिल्पकारही ठरला. तोच कर्ण शर्मा आणि त्याचे सहकारी... त्यांच्या मुंबई इंडियन्सला आणखी एक विजय आणि विजेतेपदाची झळाळती ट्रॉफी मिळवून देण्याच्या इराद्यानं रविवारी हैदराबादच्या रणांगणात उतरतील. पण समोर उभ्या ठाकलेल्या पुण्याच्या सुपरजायंटनंही तोच इरादा पक्का केला आहे. त्यामुळं आयपीएलच्या विजेतेपदासाठी होणारी महाराष्ट्र डर्बी ही चुरशीची ठरेल, यात शंका नाही. https://twitter.com/abpmajhatv/status/865766474085838848
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

World Fatafat Superfast News | वर्ल्ड फटाफट सुपरफास्ट बातम्या | Superfast News | ABP MajhaJob Majha | भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांवर भरती सुरू, अर्ज कसा करायचा?Amol Kolhe On Swarajyarakshak Sambhaji : राजकीय दबाव होता, हे फेक नरेटिव्ह : अमोल कोल्हेCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
Embed widget