एक्स्प्लोर
आयपीएल : पुण्याला प्ले ऑफचं तिकीट, पंजाबचं आव्हान संपुष्टात
पुणे : आयपीएल प्ले ऑफच्या दृष्टीनं निर्णायक ठरलेल्या सामन्यात पुण्यानं पंजाबचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयानं पुण्याला प्ले ऑफचं तिकीट मिळालं, तर पंजाबचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं.
गहुंजे स्टेडियमवरच्या या सामन्यात शार्दूल ठाकूरसह जयदेव उनाडकट, अॅडम झॅम्पा आणि डॅनियल ख्रिस्तियन यांनी पुण्याच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्या चौघांनी पंजाबचा अवघ्या 73 धावांत खुर्दा उडवला.
शार्दूल ठाकूरनं 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. जयदेव उनाडकट, अॅडम झॅम्पा आणि डॅनियल ख्रिस्तियन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं राहुल त्रिपाठीच्या साथीनं 41 धावांची भागीदारी रचून पुण्याच्या विजयाचा पाया आणखी भक्कम केला. मग त्यानं स्टीव्ह स्मिथच्या साथीनं पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अजिंक्यनं नाबाद 34, राहुलनं 28, तर स्मिथनं नाबाद 15 धावांची खेळी उभारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement