एक्स्प्लोर
महाराष्ट्राच्या पोलिसाची कमाल, कॅलिफोर्नियातील कुस्तीत ‘सुवर्ण’कमाई
महाराष्ट्राच्या रवींद्र जगताप याने अमेरिकेत तिरंगा फडकवला आहे. अमेरिकेतील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत रवींद्रने सुवर्ण कमाई केली आहे.
कॅलिफोर्निया : महाराष्ट्राच्या रवींद्र जगताप याने अमेरिकेत तिरंगा फडकवला आहे. अमेरिकेतील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत रवींद्रने सुवर्ण कमाई केली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आयोजित जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाच्या रवींद्र जगतापनं 70 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानं आदल्याच दिवशी 71 किलो ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात रौप्य पदक जिंकलं होतं.
दोन्ही कुस्ती प्रकारात पदकं मिळवून रवींद्र जगतापनं नवीन इतिहास रचला आहे. याआधी हिंदकेसरी मारुती माने यांनी जाकार्ता येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत अशीच दुहेरी कामगिरी केली होती.
रवींद्र जगताप हा पुणे पोलिस दलात आहे. त्याला कळंतरे सर, हनुमंत जाधव आणि रणवीरसिंह रहाल यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement