एक्स्प्लोर

Ravindra Jadeja : न्यूझीलंड टीम इंडियाला कायम नडली, पण जडेजा सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये लढला आणि जिंकला सुद्धा! सुटलेल्या कॅचची भरपाई केली

किंग कोहलीने पुन्हा एकदा चेस करताना नांगर टाकून विजय मिळवून दिला. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी न्यूझीलंडला टीम इंडियाने धुळ चारली. कोहलीला रवींद्र जडेजाने नाबाद 39 धावांची खेळी करत 'विराट' साथ दिली.

Ravindra Jadeja : किंग कोहलीने पुन्हा एकदा चेस करताना नांगर टाकून विजय मिळवून दिला. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी न्यूझीलंडला टीम इंडियाने धुळ चारली. कोहलीला रवींद्र जडेजाने नाबाद 39 धावांची खेळी करत 'विराट' साथ दिली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्ल्डकपमध्ये जडेजा न्यूझीलंडसमोर लढला, पण 2019 मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आज मात्र, त्याने कोहलीला साथ देत विजय खेचून आणला. त्यामुळे रचिन रविंद्रला दिलेल्या जीवदानाची सुद्धा परतफेड केली. 

रवींद्र जडेजाने आयसीसी विश्वचषक-2019 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळून सर्वांची मने जिंकली होती. या सामन्यात जडेजाने दमदार कामगिरी केली. आधी क्षेत्ररक्षणात धावा वाचवल्या आणि नंतर संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी अशी खेळी खेळली, जी दीर्घकाळ स्मरणात राहिली होती. या सामन्यात जडेजाने प्रथम क्षेत्ररक्षण करत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरला धावबाद केले. याशिवाय त्याने किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांचेही झेल घेतले होते. त्यावेळी रवींद्र जडेजा विश्वचषकाच्या बाद फेरीत आठव्या क्रमांकावर अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला होता. न्यूझीलंडविरुद्ध जडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात जडेजा फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या 6 विकेटवर 92 धावा होती. तो पराभव आजही चाहते विसरलेले नाहीत, पण आज त्याची परतफेड झाली आहे. 

तत्पूर्वी, सुमारे साडेनऊ वर्षांपूर्वी सुद्धा न्यूझीलंडला जडेजा नडला होता आणि सामना टाय केला होता. भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. मालिकेतील तिसरा सामना ऑकलंडच्या खेळपट्टीवर खेळला जात होता. तेव्हा ब्रेंडन मॅक्क्युलम किवी संघाचा कर्णधार होता. त्याची आक्रमकता सर्वश्रुत आहे. तिसरा सामना सुरू झाला तेव्हा न्यूझीलंडने आक्रमक वृत्ती स्वीकारत प्रथम फलंदाजी करत धावफलकावर जलदगतीने 314 धावा केल्या. न्यूझीलंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. मात्र, आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. याचा परिणाम असा झाला की 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर किवी संघाने 10वी विकेट गमावली.

येथे न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 111 धावांची आणि केन विल्यमसनने 65 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाच्या सर्व 6 गोलंदाजांनी विकेट घेतल्या. काहींना एक तर काहींना दोन विकेट मिळाल्या. आतापर्यंत सर्व काही सामान्य होते पण खरा थरार भारतीय फलंदाजीने सुरू झाला.

चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय डाव विखुरला

'करा किंवा मरो' सामन्यात टीम इंडियाने 315 धावांचे लक्ष्य हुशारीने पार केले. पहिल्या विकेटसाठी रोहित आणि शिखर जोडीने 56 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली पण शिखरला कोरी अँडरसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शिखरची ही विकेट अशी होती की, त्यानंतर भारतीय संघात विकेट्सची झुंबड उडाली होती. काही वेळातच रोहित शर्मा (39), विराट कोहली (6) आणि अजिंक्य रहाणे (3) हेही पॅव्हेलियनमध्ये परतले. आता टीम इंडियाने 79 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या.

धोनीने काही काळ डावाची धुरा सांभाळली

येथून कर्णधार एमएस धोनीसह सुरेश रैनाने डावाची धुरा सांभाळली. मात्र, रैना 31 धावा करून पुढे गेला. यानंतर धोनीने आर अश्विनसोबत काही काळ डाव सुरू ठेवला आणि त्यानंतर 50 धावा केल्यानंतर तो कोरी अँडरसनचा बळी ठरला. 184 धावांपर्यंत पोहोचेपर्यंत टीम इंडियाने आपले सर्व टॉपचे 6 फलंदाज गमावले होते. येथून आर अश्विन आणि जडेजाने खेळ बदलला.

आर. अश्विनला पुनरागमनाची संधी दिली

आर अश्विन आणि जडेजा यांच्यात 55 चेंडूत 85 धावांची तुफानी भागीदारी झाली. येथे अश्विनने 46 चेंडूत जलद 65 धावा केल्या. तो एकूण 269 धावांवर नॅथन मॅक्युलमचा बळी ठरला. अश्विनची विकेट पडल्यानंतर पुन्हा एकदा मजबूत दिसणाऱ्या टीम इंडियाची पडझड झाली आणि 17 धावांत भुवनेश्वर कुमार (4) आणि मोहम्मद शमी (2) यांच्या विकेट्सही गमवाव्या लागल्या. परिस्थिती अशी होती की टीम इंडियाने 286 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या.

जडेजाने हरवलेला सामना फिरवला

भारतीय संघाला आता विजयासाठी 13 चेंडूत 28 धावा हव्या होत्या आणि फक्त एक विकेट शिल्लक होती. भारताच्या सर्व आशा रवींद्र जडेजावर होत्या. जडेजानेही या अपेक्षा पूर्ण केल्या. त्याने बहुतेक फटके स्वतःकडे ठेवले आणि शेवटची विकेट पडू दिली नाही. टीम इंडियाला आता शेवटच्या तीन चेंडूंवर विजयासाठी १२ धावांची गरज होती. भारत हा सामना हरला असे वाटत होते पण जडेजाने आधी कोरी अँडरसनला चौकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकला. जडेजाने येथे संपूर्ण सामना फिरवला होता. आता टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर दोन धावा करायच्या होत्या. येथे जडेजाने प्रयत्न केले पण त्याला एकच धाव करता आली आणि सामना बरोबरीत सुटला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊतPune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut Delhi : त्यांच्या अश्रूंना काय किंमत ? रडतील रडतील आणि… संजय राऊतांचा घणाघात #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Embed widget