एक्स्प्लोर
रणजी फायनल : अक्षय वाडकरची शतकी खेळी, विदर्भाकडे 233 धावांची आघाडी
विदर्भ आणि दिल्ली संघांमधला हा अंतिम सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरु आहे.
इंदूर : अक्षय वाडकरच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात सात बाद 528 धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर 233 धावांची आघाडी घेतली. विदर्भ आणि दिल्ली संघांमधला हा अंतिम सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरु आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वाडकर 133 धावांवर, तर सिद्धेश नेरळ 56 धावांवर खेळत होता. अक्षय वाडकरने प्रथम श्रेणी कारकीर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने नाबाद 133 धावांची खेळी 16 चौकार आणि एका षटकाराने सजवली.
यष्टिरक्षक अक्षय वाडकरने विदर्भाच्या डावात कमालीच्या सहजतेने फलंदाजी केली. वाडकरने वैयक्तिक शतक झळकावलंच, पण त्याने दोन मोठ्या भागीदारी रचून विदर्भाच्या भक्कम पायावर धावांचा कळसही चढवला.
वाडकरने आदित्य सरवटेच्या साथीने सातव्या विकेटसाठी 169 तर आठव्या विकेटसाठी सिद्धेश नेरळसह 113 धावांची अभेद्य भागीदारी रचली. आदित्य सरवटेने 11 चौकारांसह 79 धावांची खेळी उभारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement