एक्स्प्लोर
राज्यवर्धन सिंह राठोड यांचं सायना, विराट, हृतिकला चॅलेंज
स्वत: एक खेळाडू असलेल्या राज्यवर्धन राठोड यांनी 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी नेमबाजीत रौप्यपदकही मिळवलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी अनोख्या पद्धतीने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. राठोड यांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन अभिनेता हृतिक रोशन, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवालला आव्हान देत, या मोहीमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राज्यवर्धन राठोड यांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऊर्जेतून प्रेरणा मिळाल्याचं मागील वर्षी क्रीडा मंत्री बनलेल्या राज्यवर्धन राठोड यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. पंतप्रधान रात्रंदिवस काम करतात आणि संपूर्ण देश फिट व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या कामात व्यायामाचा समावेश करण्याबाबत सांगतात, असं राठोड म्हणाले.
यासाठी राज्यवर्धन राठोड यांनी नागरिकांना व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं आहे. राठोड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्वत:च्या कार्यालयातच पुश अप्स करताना दिसत आहेत. राठोड यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना फिटनेसबाबत जागरुक करताना 'हम फिट तो इंडिया फिट' हा नाराही दिला आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी या मोहीमेत हृतिक, सायना आणि कोहलीला नॉमिनेट केलं आहे. नेटीझन्स राज्यवर्धन राठोड यांच्या मोहीमेचं कौतुक तर करत आहेतच, तर त्याला उत्तर म्हणून व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओही पाठवत आहेत.#HumFitTohIndiaFit ????????????
Post pictures and videos of how you keep yourself fit and send a #FitnessChallenge to your friends on social media. Here's my video ????and I challenge @iHrithik, @imVkohli & @NSaina to join in???? pic.twitter.com/pYhRY1lNEm — Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) May 22, 2018
स्वत: एक खेळाडू असलेल्या राज्यवर्धन राठोड यांनी 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी नेमबाजीत रौप्यपदकही मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारची मोहीम सुरु झाल्याने त्याचा नक्कीच प्रभाव पडू शकतो.#HumFitToIndiaFit Excellent Rathore Sir. Yoga with my 2 yrs old. ???????? pic.twitter.com/7W0MSv0Ur5
— Hitesh (@hits_sharma) May 22, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement