एक्स्प्लोर
मुंबई इंडियन्सचा आणखी एक पराभव, राजस्थानचा ‘रॉयल विजय’
अतिशय चुरशीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.

जयपूर : राजस्थान रॉयल्सनं अतिशय चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सवर तीन विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं राजस्थानसमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर मुंबईच्या प्रभावी माऱ्यासमोर राजस्थानची 6 बाद 125 अशी अवस्था झाली होती.
अखेरच्या क्षणी 15 चेंडूत 40 धावांची आवश्यकता असताना के गौतमनं सामन्याची सूत्रं आपल्या हातात घेतली. गौतमनं दमदार फलंदाजी करताना राजस्थानला दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्यानं 11 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 33 धावा फटकावल्या. त्याआधी संजू सॅमसननं 52 धावांची खेळी करत राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. तर बेन स्टोक्सनही 40 धावांचं योगदान दिलं.
राजस्थानचा सहा सामन्यातला हा तिसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा यंदाच्या मोसमातला चौथा पराभव होता.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















