Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? माजी क्रिकेटपटूचं नाव आघाडीवर
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली.
Team New Head Coach : भारत यावर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं खास प्लॅन तयार केलाय. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. ज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय, राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. तसेच राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांचं नाव आघाडीवर आहे. या पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रबळ दावेदार मानलं जात आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. याशिवाय, राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. आशिया चषक 2022 दरम्यान राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणनं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळली होती.
Team New Head Coach : बीसीसीआयचा खास प्लॅन
विशेष म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण हे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण 2022 साली अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय प्रशिक्षक म्हणून वेस्ट इंडिजला गेले होते. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय अंडर-19 संघानं नेत्रदीपक कामगिरी करत विजेतेपद पटकावलं होतं.व्हीव्हीएस लक्ष्मणसह हार्दिक पांड्यालाही भारताच्या टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनवलं जाऊ शकते. तर, बीसीसीआय वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षकांचा विचार करू शकते, अशी चर्चा आहे.
Team New Head Coach : व्हीव्ही लक्ष्मणची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणनं 134 कसोटी आणि 86 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. कसोटी क्रिकेटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर 8 हजार 781 धावांची नोंद आहे. ज्यात 17 शतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा शतकांच्या मदतीनं 2 हजार 338 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
IPL 2023: सौरव गांगुलींची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पुन्हा एन्ट्री, मोठी जबाबदारी मिळाली